शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

"शिव्या घालायच्या असतील आम्ही बांधलेल्या रस्ते, अटलसेतूवरुन येऊ नका, समुद्रातून बोटीने या"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 6:05 PM

पालकमंत्री उदय सामंत यांची महाविकास आघाडीचे नेते व उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका.

उरण : उरणच्या सभेसाठी अटलसेतुवरुन आलात आणि शिव्या घालुन गेलात. शिव्या घालायच्या असतील तर आम्ही बांधलेले रस्ते, अटलसेतुवरुन  येऊ नका.समुद्रमार्गे बोटीतून या. अशी बोचरी टिका राज्याचे उद्योगमंत्री व रायगडाचे पालक मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीचे नेते व उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता मेळाव्यातुन केली.

मावळ लोकसभेच्या उरण विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्याचा मेळावा रविवारी जेएनपीएच्या बहुउद्देशीय सभागृहात राज्याचे उद्योगमंत्री व रायगडाचे पालक मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यातून मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत यांनी उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली.उरण येथील ४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर केलेल्या टिकेचा धागा पकडून पालक मंत्री उदय सामंत यांनी भाजप आघाडीच्या केंद्र व राज्य सरकारने उभारलेले रस्ते अटलसेतुवरुन येऊन शिव्या घालायच्या असतील आम्ही बांधलेले रस्ते, अटल सेतुवरुन येऊ नका.समुद्रमार्गे बोटीतून या. अशी बोचरी टिका महाविकास आघाडीचे नेते व उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता मेळाव्यातुन केली.  तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत फेसबुकवरून संवाद साधणारे असा उल्लेख करून खोटे बोलू पण रेटून बोलू हीच विरोधकांनी राजनिती अवलंबली असल्याची टिकाही सामंत यांनी केली. 

रायगडमधील शेतकऱ्यांवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.विरोधानंतर रसायनीत उभारण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली आहे. सिडकोच्या नैना, एमएमआरडीए आणि इतर प्रकल्पाला  जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादनाला येथील शेतकऱ्यांनाचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणत्याही जमीनी संपादन करण्यात येणार नाही नसल्याची ग्वाहीही पालक मंत्री उदय सामंत यांनी दिली.नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.दिबांचे सुपुत्र अतुल पाटील यांनीही व्यासपीठावरुन बोलताना नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता.याला उत्तर देताना विरोधकांनी सत्तेत असताना विमानतळाला दिबांचे नाव देण्याच्या नावाखाली षडयंत्र रचले होते. मात्र आता राज्य सरकारने नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला असल्याचे सामंत यांनी भाषणातून सांगितले.मावळ लोकसभा मतदारसंघात संघात कुणीही ओळखत नसलेल्या उमेदवारापेक्षा विकासाची कामे केलेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहनही सामंत यांनी यावेळी भाषणातून केले.

याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणातून दहा वर्षांच्या खासदारकीच्या कारकिर्दीत उरण मतदार संघात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही व्यासपीठावरुन धनुष्य बाण निशाणीची घोषणा करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.यावेळी भाजप आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली.तसेच यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे, अतुल पाटील यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Raigadरायगड