नामदेव मोरेनवी मुंबई : वनविभागाने कर्नाळा किल्ला पर्यटकांसाठी खुला केला असून, भेट देणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. परंतु गडाच्या माथ्यावर सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना नसून स्वयंसेवकही नेमण्यात आलेले नाहीत. गडावर जाण्याच्या मार्गावरील निवारा शेडचीही वादळामध्ये दुरवस्था झाली असून, ते पुन्हा बांधण्याची मागणी केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या किल्ल्यांमध्ये कर्नाळाचा समावेश आहे. अभयारण्य व गडाला प्रत्येक वर्षी ८० हजार ते १ लाख नागरिक भेट देत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील निसर्ग भटकंतीसाठी सर्वांत आवडते ठिकाण म्हणूनही कर्नाळा प्रसिद्ध आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून हे ठिकाणही बंद केले होते. वनविभागाने १२ नोव्हेंबरला किल्ला पर्यटकांसाठी खुला केला आहे. भेट देणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. या परिसराची देखभाल करण्यासाठी संयुक्त वनसमिती स्थापन करण्यात आली आहे. पर्यटकांकडून शुल्कही घेतले जात आहे. परंतु त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. गडावर जाताना यापूर्वी उभारण्यात आलेल्या निवारा शेडची वादळामध्ये दुरवस्था झाली आहे. पत्रे पडले आहेत. यामुळे डोंगर चढणाऱ्या नागरिकांना विश्रांतीसाठी जागाच उपलब्ध नाही. हे शेड पुन्हा तत्काळ उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे
गडाच्या माथ्यावर मुख्य बालेकिल्ल्याच्या परिसरात स्वयंसेवक नेमण्याची आवश्यकता आहे. रविवारी तीन वाजण्याच्या सुमारास सुळक्यावरील मधमाश्या अचानक उठल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होेते. अशा प्रसंगात नक्की काय करायचे हे सांगण्यासाठी एकही स्वयंसेवक उपलब्ध नव्हता. माश्या पर्यटकांना चावल्या असत्या तर काय केले असते, असा प्रश्न उपस्थित होतो.
आवश्यक उपाययोजनांची गरजn कर्नाळा किल्ला व अभयारण्य परिसरात मागील काही वर्षांत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी अनेक बदल केले आहेत. माहिती फलक सर्व ठिकाणी लावले आहेत. गडाचा इतिहास, आढळणारे पक्षी, मुलांसाठी खेळणी व इतर अनेक बदल केले आहेत. याच पद्धतीने गडावर स्वयंसेवक नेमण्यात यावेत व निवारा शेडचीही दुरुस्ती करून घ्यावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे.
आवश्यक उपाययोजनांची गरजकर्नाळा किल्ला व अभयारण्य परिसरात मागील काही वर्षांत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी अनेक बदल केले आहेत. माहिती फलक सर्व ठिकाणी लावले आहेत. गडाचा इतिहास, आढळणारे पक्षी, मुलांसाठी खेळणी व इतर अनेक बदल केले आहेत. याच पद्धतीने गडावर स्वयंसेवक नेमण्यात यावेत व निवारा शेडचीही दुरुस्ती करून घ्यावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे.