मेंदडी बलात्कार प्रकरणामुळे अवैध दारू धंद्याचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:01 AM2017-08-03T02:01:10+5:302017-08-03T02:01:10+5:30
तालुक्यातील मेंदडी गावातील आदिवासी महिलेवर ती दारूच्या नशेत असताना जंगलात नेऊन दोन नराधमांनी २९ जुलैच्या रात्री बलात्कार केला.
म्हसळा : तालुक्यातील मेंदडी गावातील आदिवासी महिलेवर ती दारूच्या नशेत असताना जंगलात नेऊन दोन नराधमांनी २९ जुलैच्या रात्री बलात्कार केला. त्यासंदर्भात काशिनाथ वाघमारे व किसन जाधव या आरोपींना म्हसळा पोलिसांनी अटक केली. ३१ जुलैला दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पीडित महिला ज्या दारूच्या गुथ्यावर दारू पिण्यासाठी गेली होती त्या दारूच्या गुथ्यावर म्हसळा पोलिसांनी धाड टाकून ८२०० किमतीची तब्बल १०० लिटर दारू जप्त केली. संबंधित अवैध दारू विक्रे त्यावर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल के लाआहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्गापासून ५०० मीटर अंतर हद्दीतील सर्व देशी व विदेशी दारूची दुकाने, परिमट रूम व बीअर बार १ एप्रिल २०१७ पासून बंद झाले आहेत. त्यामुळे तळीरामांची तहान भागविण्यासाठी अनेक अवैध दारूचे धंदे शहरासहित अनेक गावांमध्ये सुरू झाले आहेत. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे ए.एस.आय. हाके यांनी म्हसळा पोलिसांकडून १ एप्रिल २०१७ नंतर केलेल्या आठ कारवायांमध्ये देशी दारू १६.५६ लिटर, गावठी दारू ५३६.५ लिटर तर ४० लिटर माडी अशी ४८,७०४ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे व अवैध दारू विक्रे त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे
सांगितले.
एका आदिवासी महिलेवरील बलात्कार प्रकारामुळे जरी एक अवैध दारू धंद्यावर कारवाई झाली असली तरी असे अनेक अवैध दारू विक्रे ते बेधडक दारू विक्र ी करीत आहेत.