अवैध खोदकाम व झाडांची कत्तल, कुरुळच्या महिला आक्रमक, तहसीलदारांना दिले निवेदन
By निखिल म्हात्रे | Published: October 9, 2023 06:26 PM2023-10-09T18:26:44+5:302023-10-09T18:26:53+5:30
काळवे व शिंपल्या विकून आपल्या कुटूंबियाचा उदर निर्वाह करणाऱ्या महीलां याबाबत आवाज उठवायला सुरुत केली आहे.
अलिबाग - कुरुळ गावातील महिला गेले अनेक वर्ष खाडीतील कालवे, शिवल्या खणून आपले चरीतार्थ चालवित. मात्र आता कोकण बार्ज या कंपनीने या खाडीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत उत्खनन करीत आहे. त्यामुळे या गावातील महीलांचा चरीतार्थावरच घाव घातला आहे. काळवे व शिंपल्या विकून आपल्या कुटुंबियाचा उदर निर्वाह करणाऱ्या महिला याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
सोमवारी कुरुळ येथील महिला एकत्र येत कोकण बार्ज कंपनी विरोधात अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांना निवेदन दिले. तसेच आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. यावेळी कुरुळ गावच्या सरपंच अॅड. सुलभा पाटील, सदस्य भुषण बिर्जे, अवधूत पाटील, आकाश घाडगे, अॅड. योगेश घाडगे, अभिजीत घाडगे, वंदना घाडगे, रंजना पाटील, आलका म्हात्रे, सुजाता कार्लेकर, नलीनी पाटील आदी उपस्थित होते.
कुरुळ खाडीतुन मिळणा-या उत्पनावर या महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोरोना काळात संपुर्ण व्यवहार बंद असताना खाडीतील शिवल्या व कालवे विकून उदरनिर्वाह चालविला होता. आता मागील वीस दिवसांपासून कोकण बार्ज कंपनीमध्ये मोठी जहाजे बनतात सध्या कंपनी खाडीच्या क्षमतेपेक्षा मोठी जहाजे खाडीतुन येत आहेत.
कंपनीने ग्रामस्थांना विश्वासास न घेता अवैध रित्या खाडीमध्ये मँग्रोज ची मोठी प्रमाणात तोड करीत कुरुळ खाडीतील सुमारे १५०० ब्रास वाळू मिश्रीत रेती चे उत्खनन केल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. या वाळु मिश्रित रेती मध्येच तिस-या व कालवे यांचे नैसर्गिक रित्या उत्पादन होते. जर असेच अवैध रित्या उत्खनन चालु राहिले तर कुरुळ गावातील व परिसरातील सुमारे २०० हुन अधिक कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.
मागील साठ वर्षांपासून आमच्या गावातील महीला खाडीतील शिवळ्या व काळवे विकून कुटूंबाचा चरीतार्थ चालवितात. मात्र हि कोकण बार्ज कंपणी आमच्या महीलांचा रोजगार हिरावून घेत आहे. सतत होणारे खाडीतील खोदकाम थांबविण्यासाठी आम्ही कंपणी प्रसासनासोबत बतचीत हि केली मात्र कंपणीच्या अधिकाऱ्यांनी थातूक-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली.
- अॅड. सुलभा पाटील, सरपंच.
कोकण बार्ज कंपणी कोणालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा समजूतीने घेऊनही या कंपणीने हम करे सो कायदा चालविला आहे. सतत असेच होत राहील्यास कोणताही अनुसुचित प्रकार घडला तर कायदा व व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी हि प्रशासनाची असेल. कंपणी प्रशासना विरोधात केलेल्या अर्जाचा आपण जाणीव पुर्वक विचार करून आम्हा गावकऱ्यांना योग्य तो न्याय दयावा.
- भुषण बिर्जे, सदस्य.
आमच्यावर अन्याय करणाऱ्या कंपणीवर कायदेशिर कारवाई झाली नाही तर आम्ही महिला आपल्या कार्यालया समारे उपोषणास बसु. आमच्या न्याय व हक्कासाठी आम्ही असाच लढा देत राहू.
- रेश्मा घाडगे, गावकरी महिला.