- संदीप जाधवमहाड : वाळूउपसा करण्यास असलेली बंदी झुगारून महाड शहराजवळ महामार्गालगत असलेल्या गांधारी नदीच्या पात्रात दररोज शेकडो ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे. या गंभीर बाबीकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आरोप स्थानिकांकडून केले जात आहेत. पोकलेन आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने बेधडकपणे सुरू असलेल्या वाळूउपशामुळे महामार्गावरील गांधारी पुलाशेजारी सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामातील नवीन पुलाच्या बांधकामातही मोठे अडथळे निर्माण होत आहेत.गांधारी नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा वाळूउपसा करण्यात येत आहे. वाळूउपसा करणारे सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधित असून, राजकीय वरदहस्तामुळे या वाळमाफियांवर कारवाई करण्याचे धाडस महसूल विभागाकडून होत नसल्याची परिसरात चर्चा आहे.नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर उपसा केलेली वाळू महाड-रायगड मार्गावरील नाते गावच्या पुढे एक कि.मी. असलेल्या एका खासगी जागेत ठेवण्यात येत आहे. या बेकायदेशीर वाळूच्या साठ्यांकडे तलाठी वा मंडल अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. बंदी असतानाही गांधारी नदीपात्रात बेसुमारपणे होत असलेला हा वाळूउपसा त्वरित थांबवून वाळूमाफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.महाडमधील पुलाच्या कामात अडथळारायगड जिल्ह्यातून उल्हास, गाढी, पातळगंगा, सावित्री, काळू, अंबा या नद्या वाहतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून या नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.१उपसा होत असलेल्या ठिकाणी पुलाचे पिलर्स उभारण्याचे काम सुरू असून, उपशामुळे पुलाच्या कामातदेखील अडथळे येत असल्याच्या तक्र ारी होत आहेत. मात्र, दहशतीच्या बळावर हा रात्रंदिवस उपसा सुरूच आहे.२उपसा केलेल्या वाळूची दोन ते तीन डंपर्समधून विक्र ीसाठी वाहतूक केली जात असून, कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचे दिसून येत असतानाही महसूल विभागाचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत आहेत.३या वाळूतस्करांवर कारवाई करून बेकायदेशीर उपसा केलेले वाळूचे साठे तसेच यंत्रसामग्री महसूल विभाग जप्त करण्याची धमक दाखवेल काय? असा प्रश्न विचारला जात आहे.जिल्ह्यातील महाड ते धरमतर खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात आहे. त्याबरोबरच किहीम बीचवरही वाळू उत्खनन झाल्याने किनाऱ्यालगतची २५ ते ३० झाडे उत्मळून पडल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली आहे. परिणामी किनाºयाची धूपही मोठ्या प्रमाणात होत असून पर्यटनावरही परिणाम होत आहे.पनवेल तालुक्यातील जुई कामोठे परिसरात आॅक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आलेल्या कारवाईत ४० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. याशिवाय सक्शनपंप नष्ट करण्यात आले. मात्र, या वेळी कुणालाही अटक करण्यात आली नाही. वाळूमाफियांवर कठोर कारवाई केली तरच बेकायदा उत्खननाला आळा बसेल.यावर ठोस कारवाई होत नसल्याने काहीच दिवसांत परिस्थिती जैसे थे होते. वाळूमाफियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस कारवाईची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गांधारी नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा; राजकीय वरदहस्तामुळे महाडमध्ये महसूल विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 12:17 AM