शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

मुरुडच्या मिठागर भागात अवैध वाळूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:19 PM

महसूल विभागाची कारवाई; रेती उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

आगरदांडा : सावली ग्रामपंचायत हद्दीमधील मिठागर भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध उत्खनन सुरू असून, शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता खाडीमधील वाळू काढून गैरमार्गाने विक्री करण्यात येत होती. महसूल विभागाला याबाबत महिती मिळाली असता कारवाई करत वाळूचा साठा जप्त केला.मिठागर येथे बंद पडलेल्या वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार गमन गावित यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी मंडळाधिकारी विजय म्हापुसकर व तलाठी यांच्यासह घटनास्थळी जाऊन तेथील वाळूचा साठा जप्त केला आहे. तहसीलदार गमन गावित यांच्या धडक कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणाºया वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. अवैध रीत्या पकडलेला वाळूसाठा हा ७५ हजार रुपयांचा होता. ही पकडलेली वाळू लिलाव पद्धतीने विकण्यात आली आहे. या प्रकरणी कोणालाही अटक केली नाही. हा वाळू अड्डा जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आला. या धाडीत सक्शन पंप अथवा बोटसुद्धा मिळाली नाही.ही कार्यवाही तहसीलदार गमन गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या वेळी नायब तहसीलदार रवींद्र सानप, नायब तहसीलदार प्रल्हाद कौटुंबे, मंडळ अधिकारी विजय म्हापुसकर, तलाठी रूपेश रेवस्कर, तलाठी रेश्मा वीरकूड, तलाठी वनिता जायभाय, कोतवाल संदीप कोम आदी उपस्थित होते.गस्त वाढवण्याची मागणीमुरुड तालुक्यातील सावली ग्रामपंचायत ही तालुक्याची शेवटची ग्रामपंचायत असल्याने मुरुड शहरापासून असणारे अंतर हे खूप लांब असल्याने या भागात अवैध वाळूउपसा करण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.महसूल विभागाने येथील अवैध वाळूउपसा कायमस्वरूपी बंद होण्यासाठी गस्तीचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.