माथेरान घाटात बेकायदा वृक्षतोड, वनविभागाची कारवाई, आदिवासी महिलांनी के ला पोेबारा, लाकडाच्या मोळ्या जप्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:33 AM2017-09-15T06:33:36+5:302017-09-15T06:33:51+5:30

घनदाट वृक्षझाडी असल्यामुळे माथेरानला हरित माथेरान म्हणून संबोधतात. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यातील काही महिलांनी वृक्षतोड केलेल्या लाकडाच्या मोळ्या पकडून वन विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई होणार हे लक्षात येताच तोडलेली लाकडे तिथेच टाकून महिलांनी पोबारा केला.

Illegal tree trunk in Matheran Ghat, forest department action, tribal women seized K La Puebara, wood bundes | माथेरान घाटात बेकायदा वृक्षतोड, वनविभागाची कारवाई, आदिवासी महिलांनी के ला पोेबारा, लाकडाच्या मोळ्या जप्त  

माथेरान घाटात बेकायदा वृक्षतोड, वनविभागाची कारवाई, आदिवासी महिलांनी के ला पोेबारा, लाकडाच्या मोळ्या जप्त  

Next

माथेरान : घनदाट वृक्षझाडी असल्यामुळे माथेरानला हरित माथेरान म्हणून संबोधतात. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यातील काही महिलांनी वृक्षतोड केलेल्या लाकडाच्या मोळ्या पकडून वन विभागाने त्यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई होणार हे लक्षात येताच तोडलेली लाकडे तिथेच टाकून महिलांनी पोबारा केला.
माथेरान हे चहूबाजूने जंगलाने वेढलेले आहे. माथेरानच्या पूर्वेला असलेल्या वॉटरपाइप स्टेशनच्या वरच्या बाजूला व पॅनोरमा पॉइंटच्या खालच्या बाजूस असलेल्या जंगलात जुम्मापट्टी येथील ३० ते ४० महिला दररोज या जंगलात वृक्षतोड करायला येतात. दिवसागणिक ४० ते ५० लाकडांच्या मोळ्या नेत असताना माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय शिंदे यांनी या महिलांना अडवून, ‘तुम्ही अमानुष वृक्षतोड करू नका’ असे सांगितले. त्यावर, ‘आम्हाला माथेरानशी काहीही देणे-घेणे नाही’ असे सांगून, दररोज हा प्रकार माथेरान घाटात घडत होता. यावर शिंदे यांनी सोशल मीडियावर ही माहिती झळकवताच वन विभाग खडबडून जागे झाले.
नेरळ वनविभाग येथील वनपाल दत्तात्रेय निरगुडा, दस्तुरी येथील वनपाल पुंडलिक खाडे, जुम्मापट्टी येथील वनरक्षक रोहिदास मोरे, वाहनतळ वनरक्षक नंदा गावित, वनमजूर काळूराम जामघरे, जानू शिंगाडे व धोंडू बांगारे या टीमने गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून पाळत ठेवली. सर्व महिला जंगलात झाडे तोडत असताना, ही टीम रेल्वे ट्रॅकवरून चालत जंगलात घुसताच या महिलांनी कोयते व लाकडे तिथेच टाकून पोबारा केला. घटनास्थळावरून वन विभागाने १० कोयते व १० लाकडांच्या मोळ्या जप्त करून बेवारस म्हणून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक चौकशी वनपाल दत्तात्रेय निरगुडा करीत आहेत. अशा प्रकारच्या वृक्षतोडीने पर्यावरणाचा ºहास होत आहे.

आदिवासींमध्ये वृक्षलागवडीबाबत जनजागृतीची गरज
1दरवर्षी माथेरानकर पावसाळ्यात निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीसदस्यांकडून वृक्षारोपण आणि संवर्धन केले जात आहे. तर नगरपालिकेच्या माध्यमांतून सुद्धा फक्त वृक्षारोपण करण्यात येते.
2त्यांच्यामुळेच संपूर्ण परिसरात खºया अर्थाने ठिकठिकाणी हिरवळ दिसत आहे; परंतु माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीवाड्यांमध्ये वृक्षारोपणाचे अन् झाडांचे महत्त्व अद्याप समजलेले नाही.
3तेथे याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. जुम्मापट्टी, माणगाववाडी येथील काही आदिवासी दर दिवशी चाळीस ते पन्नास आदिवासी महिला-पुरु ष राजरोसपणे येथील वॉटरपाइपच्या वरच्या भागात झाडे तोडून रोज माथेरान घाट रस्त्यावरून लाकडाच्या मोळ्या, तसेच मोठाले ओंडके घेऊन जात असतात.

येथे होते वृक्षतोड
जुम्मापट्टी, माणगाववाडी, पॅनोरमा पॉइंटखालील कोमलवाडी, आनंदवाडी, आंबेवाडी, फणसवाडी या ठिकाणचे आदिवासी माथेरान रेल्वेस्थानक वॉटरपाइप आणि पॅनोरमा पॉइंटखालच्या भागात मोठ्या संख्येने वृक्षतोड करत असतात. माथेरानचे पर्यटन आणि स्थानिकांचा व्यवसाय आबाधित राखायचा असेल, तर वनखात्यातील सक्षम अधिकाºयांनी वेळीच ठोस उपाययोजना करून नियमितपणे होणाºया वृक्षतोडीवर अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचे वयोवृद्ध मंडळींचे म्हणणे आहे.

स्थानिकांच्या तक्रारी
ज्या बळावर माथेरान आजही मोठ्या दिमाखात प्रस्थापित आहे, तेच रान परिसरातील लोक विस्थापित करण्याच्या मार्गावर असल्याने माथेरानचे उज्ज्वल भविष्य अंधकारमय होणार असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त के ली आहे. माथेरान या शब्दातच या गावाची व्याप्ती दडलेली आहे. उंच डोंगराच्या माथ्यावर असलेले घनदाट रान अर्थातच माथेरान होय. त्यामुळेच १८५०मध्ये माथेरानचा शोध लावणारे ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर मॅलेट यांनी हे साजेसे नाव या स्थळास दिले आहे; परंतु परिसरातील आदिवासी लोक जंगलांनी परिपूर्ण व्यापलेला डोंगर मोकळा करण्यासाठी दैनंदिन झाडांच्या मुळावर कोयता अन् कु ºहाडीचे घाव घालून, हे जंगल संपवत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी वन विभागाकडे के ल्या होत्या.

चार वर्षांपूर्वी वनविभागाने जुम्मापट्टी येथील आदिवासींना सांगितले की, शासनाकडून तुम्हाला गॅस शेगडी व गॅस टाकी मिळेल. यासाठी येथील आदिवासी लोकांनी प्रत्येकी १२०० रु पये भरूनसुद्धा आजतागायत त्यांना गॅस शेगडी व गॅस टाकी मिळाली नाही.

Web Title: Illegal tree trunk in Matheran Ghat, forest department action, tribal women seized K La Puebara, wood bundes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.