उरण तालुक्यात अवैध दारूविक्रेत्यांचे पेव; युवापिढीचे भवितव्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:40 PM2019-07-20T23:40:39+5:302019-07-20T23:41:06+5:30

अनधिकृत दारूविक्रेत्यांमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. उरण परिसर औद्योगिकीकरणामुळे झपाट्याने प्रगत होत आहे.

Illicit liquor shops in Uran taluka; | उरण तालुक्यात अवैध दारूविक्रेत्यांचे पेव; युवापिढीचे भवितव्य धोक्यात

उरण तालुक्यात अवैध दारूविक्रेत्यांचे पेव; युवापिढीचे भवितव्य धोक्यात

Next

मधुकर ठाकूर

उरण : उरण परिसरात सध्या अनधिकृत देशी-विदेशी दारूविक्रेत्यांचे पेव फुटले आहे. तालुक्यातील बहुतांश गावांतील घरे, गल्लीबोळातील छोट्या-मोठ्या दुकानापासून अगदी पानटपरीवरही सर्रास सर्व प्रकारातील दारू उपलब्ध होत आहे. त्यामुळे युवापिढीसह शालेय विद्यार्थीही व्यसनाधीन होऊ लागले असून, गुन्हेगारीकडे वळून बरबाद होण्याच्या मार्गावर आहेत.

अनधिकृत दारूविक्रेत्यांमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. उरण परिसर औद्योगिकीकरणामुळे झपाट्याने प्रगत होत आहे. या ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हजारो कामगार परिसरातील गावात भाड्याने घर घेऊन राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनधिकृत दुकाने, टपऱ्यांची संख्याही वाढत असून खुलेआम विविध प्रकारची दारू अवैधरीत्या विक्री केली जात आहे. या विक्रेत्यांना घरपोच दारूचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. उरण तालुक्यात गावोगावी घरातून अथवा दुकान, पानटपºयांमधून मोठ्या प्रमाणात चालणाºया अवैध देशी-विदेशी दारूविक्रेत्यांना स्थानिक पोलीस, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांचे अर्थपूर्ण सहकार्य मिळत असल्याने कारवाईस टाळटाळ होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

उरण तालुक्यात अधिकृत साधारणत: परमिट रूमची संख्या २० तर देशी बारची संख्या सात आहे. अधिकृत परमिट रूम, देशी बारधारक फक्त विविध शासकीय व्यवसायाला लागणाºया परवानग्यांसाठीच वर्षाकाठी सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये मोजत आहेत. उरण तालुक्यात प्रत्येक गावात अवैध देशी-विदेशी दारू विक्रीची सुमारे २५० ते ३०० दुकाने आहेत. या अवैध दारूविक्रेत्यांना वाइनशॉपमधूनच घरपोच दारू पुरवठा केला जात असल्याचा आरोपही अधिकृत विक्रेत्यांकडून केला जात आहे. याबाबत दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्षच होत आहे. उलट अशा प्रकरणात अधिकृत तक्रारदारावरच राग ठेवून अधिकारी सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोपही केला जात आहे. याबाबत असोसिएशनकडे तक्रारीही करण्यात आल्याची माहिती उरणमधील काही अधिकृत परमिट रूम, देशी बारमालकांकडून देण्यात आली.

दारू उत्पादन शुल्क विभागाची हद्द ९० किलोमीटरपर्यंत आहे. मात्र, यासाठी फक्त सातच कर्मचारी कार्यरत आहेत. मनुष्यबळाअभावी कारवाईत मर्यादा येत आहेत. अवैध दारूविक्रेत्यांबाबत तक्रारी आल्यास तत्काळ कारवाई केली जाते. मात्र, परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांची संख्या सांगणे अवघड आहे. - अशोक पिंपळवार, वरिष्ठ निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग नवी मुंबईमध्येही मद्यविक्री

उरण प्रमाणे नवी मुंबई परिसरामध्येही अवैधपणे मद्यविक्री सुरू आहे. झोपडपट्टी परिसरामध्ये अनेक ठिकाणी हातभट्टीसह इतर मद्य विक्री केली जात आहे. शहरातील बियरशॉपीच्या बाहेरही उघड्यावर मद्यपान केले जात आहे. दुकानांच्या बाहेरच मद्यपान करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Illicit liquor shops in Uran taluka;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.