नागोठणे : येथील आयपीसीएल (आताची रिलायन्स) कंपनीच्या उभारणीपासूनचा सर्व इतिहास मला ज्ञात आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली पाहिजे, या मताचा मीही आहे. मी आपल्यासोबत असून, तोडगा निघालाच पाहिजे, ही माझी भूमिका राहील. आपली जी काही भूमिका किंवा मागणी असेल, त्या दृष्टीने लक्ष घालीन, अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून येथील प्रकल्पग्रस्तांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन चालू ठेवले असून, सतराव्या दिवशी रविवारी सायंकाळी उशिरा आंदोलनस्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांशी हितगुज साधले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.जी. कोळसे पाटील राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशांक हिरे, स्थानिक अध्यक्ष चेतन जाधव, सरचिटणीस गंगाराम मिणमिणे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त गावांचे सरपंच आणि शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त गावांतील सरपंचांनी यापूर्वी आपल्याला पाठिंबा दिला आहेच. मी आपल्या सोबतच असल्याचा पुनरुच्चार करताना खा.तटकरे यांनी सरकारच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली. आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढची पावले कशी उचलायची, याबाबत तातडीने चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.लक्ष घालण्याची मागणी३० वर्षांपूर्वी सरकारने प्रकल्पग्रस्तांना लिहून दिले आहे, त्याच मागण्या आम्ही करीत आहोत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली, तेव्हा आमच्या त्यांच्यासमोर लेखी स्वरूपात दिल्या होत्या व कंपनीने त्याचे उत्तर दिले असून, ते आपल्याकडे लवकरच पोहोच केले जाणार आहे. लक्ष घालावे, अशी मागणी कोळसे पाटील यांनी खा.तटकरेंकडे केली.
मी आपल्यासोबत आहे - खा. सुनील तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:53 AM