शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:39 AM2019-04-06T04:39:35+5:302019-04-06T04:39:56+5:30

शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे बांधावरून रिपोर्टिंग. नुकसानीचे पंचनामेच होत नाहीत

Implement the schemes implemented for the farmers | शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी

शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी

Next

नागोठणे शहरात अनेक शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनी आहेत. काही नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास परिसरातील सर्व गावांमधील शेतीचे पंचनामे होतात. मात्र, अशावेळी नागोठणेतील शेतकºयांच्या शेतीचे पंचनामेच होत नसल्यामुळे सरकारकडून मिळणाºया लाभापासून शेतकºयांना कायम वंचित राहावे लागत असते. शहरातील हॉटेल व्यावसायिक तसेच इतर घरे, इमारतींचे सांडपाणी शेतात सोडले जात असल्याने पिकलेल्या वाल - पावटासारख्या कडधान्यांना वाजवी दर मिळत नाही याचीच खंत वाटते.
-जनार्दन सकपाळ, खडकआळी, नागोठणे

भाताला वाढीव
दर मिळावे
मुंबई-गोवा महामार्गापासून बाळसईमार्गे वांगणी ते वरवठणेपर्यंत जुन्या डावा तीर कालव्याचा तीन-चार वर्षांपूर्वी गाळ काढून साफसफाई केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यात अजूनही पाणीच सोडले नसल्याने शेकडो शेतकरी दुबार शेतीपासून वंचितच राहिले आहेत, त्याचा फटका अडीचशे ते तीनशे एकर शेतीला बसत आहे. यामुळे आम्हाला फक्त पावसाळी भातशेतीच करावी लागत आहे. सध्या क्विंटलला बाराशे ते तेराशेचा भाव मिळत असून वाढीव दर मिळणे गरजेचे आहे. - विठोबा दामा शिर्के, वांगणी

शेतमालाला हमीभाव मिळावा
सरकार कोणत्याही पक्षाचे येवो शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे. हंगामानुसार बियाणे खात्रीलायक व कमी दरात उपलब्ध करून द्यावीत. मोठे ओढे नद्यांना मिळतात. या ओढ्यांना काही भागात मार्च-एप्रिलपर्यंत पाणी असते. त्या पाण्यावर भाजीपाला घेतला जातो. शेतकरी अशा ओढ्यांवर दगड, मुरुम, मातीने बांध बांधून पाणी अडवितो. पुढच्या पावसाळ्यात हे कच्चे बांध फुटून जातात. शासनाने ज्या मोठ्या ओढ्यांना पाणी असते त्या ओढ्यांवर छोटे पक्के बंधारे बांधावेत.
- सुदाम कडपे, तळेगाववाडी, रसायनी

बळीराजाची काळजी
घेणारे सरकार हवे
कोकणातील शेतकºयांना उत्पन्न जोमाने मिळाले असले तरी शेतीमाल विक्र ीला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने किरकोळ विक्र ीत शेतकºयांचे नुकसान होते, तर दुसरीकडे हवामान बदलामुळे शेती करपली की अशा स्थितीत शेतकºयाला मदतीची अपेक्षा असते. शासनाचे मदत मिळण्याचे प्रस्ताव असले तरी ते वेळेत मिळत नाही. पावसाच्या आधारावर एकवेळच पीक निघताना नाकीनऊ. त्यामुळे बºयाचदा शेती ओस ठेवली जाते, यामुळे येथील तरु ण शहरात जाऊन चाकरमानी बनलाय. शेतीसाठी आधुनिक पद्धतीने उपाययोजना करणारे सरकार हवेय. येणारे सरकार बळीराजाची काळजी घेणारे असावे.
- शरद खेडेकर, शेतकरी, खुजारे, श्रीवर्धन

कं पनीच्याप्रदूषणामुळे
शेतीचे नुकसान
चार वर्षांपूर्वी शासनाने आदिवासी बांधवांना दळी प्लॉट त्यांच्या नावावर करून त्यांना सातबारा उतारा दिला जाईल, या दिलेल्या आश्वासनाची अजून पूर्तता झालेली नाही. वरी, नाचणी तसेच भात ही आमची प्रमुख उत्पादने आहेत व त्यावरच आमची उपजीविका होत असते. मिरची, काकडी, टरबूज याची पिके घेण्याचा प्रयत्न केला तर, कंपनीच्या प्रदूषणामुळे ती पूर्ण तयारच होत नाहीत. वाडीत दोनच विहिरी असल्याने उन्हाळ्यात त्या आटून जात असल्याने दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. शासनाने या भागात विंधण विहिरी उपलब्ध कराव्यात. आमच्या डोंगराळ भागात पाच कि. मी. लांबीचा केलेला रस्ता सध्या ढासळत असल्याने शेतकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
- डॉ. जानू भाग्या हंबीर, चेराठी आदिवासीवाडी

Web Title: Implement the schemes implemented for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.