अलिबाग : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली शिवशाही वातानुकूलित एसटी बससेवा येत्या काळात अलिबागच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला आहे. अलिबाग-मुंबई मार्गावर धावणाºया शिवशाही वातानुकूलित एसटी बसचा शुभारंभ गुरु वारीअॅड. पाटील यांच्या हस्ते अलिबाग एसटी बस आगारात करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.यापूर्वी मुंबई आगाराची शिवशाही बस प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-अलिबाग मार्गावर सुरू होती. आता अलिबाग आगारास शिवशाही बस मिळाल्याने आता अलिबाग-मुंबई मार्गावर ही शिवशाही बस कायमस्वरूपी चालणार असल्याचे अलिबाग एसटी आगार व्यवस्थापाक एस. पी. यादव यांनी सांगितले. शिवशाही बसचे अलिबाग-मुंबई प्रवासी भाडे प्रौढांसाठी १७० रु पये व लहानांसाठी ८६ रु पये असून, एसटीच्या कोणत्याही सवलती या बसला लागू राहाणार नाहीत.पिंपळभाट, कार्लेखिंड, तीनविरा, पेझारी, पोयनाड, पेण असे थांबे असणारी ही बस अलिबाग आगारातून मुंबईकरिता सकाळी ७ वाजता व दुपारी ३ वाजता सुटेल, तर मुंबई सेंटर येथून ही बस सकाळी १०.३० वाजता व संध्याकाळी ६.४५ वाजता सुटणार असल्याचे यादव यांनी सांगितले.या वेळी अलिबाग एसटी आगार व्यवस्थापाक एस. पी. यादव, वेल्फेअर असोसिएशन फॉर पॅसेंजर्स आॅफ कोकण संस्थेचे अध्यक्ष दिलीप जोग, चेंढरे ग्रामपंचायतीचे सदस्य अजित माळी, वडगावचे सरपंच जयेंद्र भगत, एम. डी. मगर, ए. पी. अवतार, विजय म्हात्रे, गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.>अलिबाग- पुणे बसची मागणीअलिबाग-पुणे मार्गावर अशाच प्रकारे शिवशाही बसच्या गरजेबाबत या वेळी चर्चा झाली. अलिबाग-पुणे मार्गावर ही बस सुरू केल्यास शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी पुणे व पश्चिम महाराष्ट्रातून अलिबागेत येऊ इच्छिणाºया पर्यटकांकरिता सकाळच्या वेळेत पुण्याहून सोडल्यास ती सोईची होईल व नफ्यात चालेल. तर संध्याकाळी अलिबागहून बस सोडल्यास अलिबागेतून पुण्यास व पुण्याहून पुढे जाऊ इच्छिणाºया प्रवाशांकरिता ती अत्यंत सोईची ठरेल. या चर्चेला गांभीर्याने विचारात घेऊन ही बस सुरू करण्याबाबत आपण परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे अॅड. आस्वाद पाटील यांनी सांगितले. अलिबाग सावंतवाडी व रत्नागिरी या दोन बसेस पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी या वेळी दिलीप जोग यांनी केली.
शिवशाही एसटी सेवा अलिबागच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 2:32 AM