हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेचा उपाययोजनांवर भर 

By वैभव गायकर | Published: May 29, 2024 06:44 PM2024-05-29T18:44:51+5:302024-05-29T18:45:12+5:30

महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम क्षेत्रांना उंच कंपाऊंड घालणे, ड्रेबिज वाहतुकीच्या ट्रकवरती कापड झाकणे अशा विविध उपाययोजना अमंलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

In order to reduce air pollution, Panvel Municipal Corporation focuses on implementation  | हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेचा उपाययोजनांवर भर 

हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेचा उपाययोजनांवर भर 

पनवेल- गेल्या काही दिवसापासून एमएमआर परीसरातील हवेची गुणवत्ता बिघडल्याने उच्च् न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल केली आहे. यामधील सुनावणी दरम्यान हवेतील प्रदूषण कमी करणे कामी उच्च् न्यायालयाने  निर्देश दिले आहेत. त्यानूसार प्रभावी उपाययोजना अमंलबजावणी करण्याकरिता आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांच्या सूचनेनूसार पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील संबधित विभागासोबत दि.28 रोजी मुख्यालयात बैठक घेण्यात आली.

यावेळी उपायुक्त डॉ.वैभव विधाते, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत,   सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतुक सुनिल बोंडे, सहाय्यक निरीक्षक वाहतूक  नरेंद्र औंटी, एसटी महामंडळाचे अधिकारी ज्ञानेश्वर म्हात्रे, पोलिस निरीक्षक मनोज महाडिक,घनकचरा व स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे,पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण उपस्थित होते.

हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबई शहरात जाणाऱ्या वाहनांच्या टायरवरील धूळ कमी करण्याच्या दृष्टीने खारघर टोल नाक्यावरती फवारे बसविण्याचा अभिनव उपक्रम राबविला होता. तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम क्षेत्रांना उंच कंपाऊंड घालणे, ड्रेबिज वाहतुकीच्या ट्रकवरती कापड झाकणे अशा विविध उपाययोजना अमंलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर आता एमएमआर क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने संबधित पोलिस विभाग, वाहतुक विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, एसटी महामंडळ, महाराष्ट्र राज्य् प्रदूषण मंडळ अशा विविध विभागातील निर्णयक्षम अधिकाऱ्यांची समिती बनविण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानूसार या विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयात घेण्यात आली. यावेळी हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवरती चर्चा करण्यात आली.

समितीच्या माध्यमातून कामाचा आराखडा आखणे, पथक निमिर्ती करणे, वॉर रूम तयार करणे, दंडाची निश्चिती करणे अशा विविध विषयांवरती संबधित विभागातील अधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. येत्या काही दिवसातच ही समिती बनवून त्यानूसार हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने कामकाजास सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली.

Web Title: In order to reduce air pollution, Panvel Municipal Corporation focuses on implementation 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.