रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; ६० हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट प्रवाशाला केले परत

By वैभव गायकर | Published: May 9, 2024 03:23 PM2024-05-09T15:23:46+5:302024-05-09T15:24:01+5:30

दरम्यान या प्रकारामुळे स्वप्नील कोळी याचे कौतुक केले जात आहे.

In Panvel Honesty of the Auto Driver; A gold bracelet worth 60,000 was returned to the passenger | रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; ६० हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट प्रवाशाला केले परत

रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; ६० हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट प्रवाशाला केले परत

पनवेल - खारघर सेक्टर 10 मधून रेल्वे स्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाचे सुमारे 60 हजार किमंतचे सोन्याचे ब्रेसलेट रिक्षा पडले होते.यांनतर रिक्षा चालक स्वप्नील कोळी यांनी संबंधित प्रवाशासोबत संपर्क साधून हा ब्रेसलेट प्रवाशाला परत केलं       

बुधवार दि.8 रोजी दुपारी 4 च्या सुमारास हि घटना घडली.यानंतर रिक्षा चालक स्वप्नील कोळी याने आपल्या एकता रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी यांना या घटनेची माहिती देत प्रवाशाला याबाबत तत्काळ माहिती दिली. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी खारघर सेक्टर 10 येथील बँक ऑफ़ इंडिया रिक्षा स्टॅन्ड येथे बोलावून महिला प्रवाशाला हा सोन्याचा ब्रेसलेट सुपूर्द केलं. दरम्यान या प्रकारामुळे स्वप्नील कोळी याचे कौतुक केले जात आहे.

एकता रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी देखील स्वप्नीलचे कौतुक केले.तसेच रिक्षा चालकांना बदनाम केले जाते मात्र रिक्षा चालक प्रामाणिकपणे देखील आपला व्यवसाय कशाप्रकारे करतात हे देखील या घटनेने सिद्ध झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: In Panvel Honesty of the Auto Driver; A gold bracelet worth 60,000 was returned to the passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.