लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग - जिल्ह्यात नवरात्रौत्सवाला सोमवारी सरस्वती पुजत भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील घरोघरी देविच्या मुर्तीची, घटाची, फोटोची मनोभावे प्राण प्रतिस्थापना करून आपल्या दुर्गामातेच्या पुजनात व सेवेत रममाण झाले आहे. त्यामुळे ग्रामिण भागासह शहरीभागात ही नवचैतन्य निर्माण झाले असून दुर्गामातेच्या समोरील भजन, किर्तन व धावरे नाचाने रात्री जागू लागणार आहेत.
माहाराष्ट्रात साज-या होणा-या सणांपैकी कोकणात सर्वात मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा होणा-या गणेशोत्सव सणापाठोपाठ नवरात्रोत्सवाकडे पाहीले जाते. हा सण म्हणजे कोकणकरांसाठी जणू आनंदच आसतो. यानिमित्ताने घराघरात 10 दिवस दुर्गामातेचे पुजन करण्यात तल्लीन झालेले असतात. तर या दिवसात सर्वजण आपापसातील मतभेद, दु:ख, तिंता बाजूला सारून नवरोत्रौत्सव साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमात मग्न झाले आहेत. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी गावागावात दाखल झाले असून घरातील सदस्य यानिमित्ताने एकत्र आले आहेत.
दुर्गा मातेच्या पुजनासाठी गुरुवारी सकाळपासूनच लगबग दिसून आली होती. जिल्ह्यात प्रत्येक गावागावात आपापल्या रुढी परंपरेनुसार घटाचे पुजन झाले. आजही ग्रामिण भागात पुरोहीतांकडून पुजापाठ करून विधीवत पुजन करण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी पुरोहीता अभावी घरातील जेष्ठांकडून घटाचे व दुर्गामातेच्या प्रतिमेचे पुजन होते. जिल्ह्यात नवदुर्गेच्या पारंपारीक पुजनानंतर विविध कार्यक्रम हि पार पाडण्यात आले होते.
गुरुवारी पावसाने काही काळ उघडीप दिल्याने मंडळांच्या देवी पारंपारीक वाद्य वाजवित फटाक्यांची आतषबाजी करीत आपल्या आसनस्थानी विराजमान झाल्या. त्यानंतर कोरोनाच्या नियमांचे पालन करून देवीचे दर्शन घेत होते. तर चौल येथील प्रचलित असलेल्या 10 देवींच्या मंदीरात भवानी मातेची ओटी भरण्यासाठी महीला वर्गाने गर्दी केली होती.