कॉम्प्युटरवर शिक्षण अन् स्मार्टफोनवर गृहपाठ; २ हजार १२ शाळा झाल्या डिजिटल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 06:53 AM2023-02-22T06:53:42+5:302023-02-22T06:53:54+5:30

खासगी शाळांची स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे असल्यामुळे डिजिटल शाळा बनवण्याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे.

In Raigad Education on computers and homework on smartphones; 2 thousand 12 schools became digital | कॉम्प्युटरवर शिक्षण अन् स्मार्टफोनवर गृहपाठ; २ हजार १२ शाळा झाल्या डिजिटल

कॉम्प्युटरवर शिक्षण अन् स्मार्टफोनवर गृहपाठ; २ हजार १२ शाळा झाल्या डिजिटल

googlenewsNext

अलिबाग - प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात तसेच विविध प्रयोगांतून शिक्षण घेता यावे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शाळांनी डिजिटल शिक्षणासाची कास धरली आहे.  त्यानुसार जिल्हा परिषदेच्या २ हजार ६०३ शाळांपैकी २ हजार १२ शाळा डिजिटल झाल्या आहेत.

उर्वरित ५९१ शाळांमध्ये मोबाइलच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. या शाळाही टप्प्याटप्प्याने पूर्ण डिजिटल करण्याचा मानस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या भावी आयुष्याचा पाया असल्याने येथे मिळणारे शिक्षणही आधुनिकतेला धरून असणे अत्यावश्यक आहे. त्यातच खासगी शाळांची स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे असल्यामुळे डिजिटल शाळा बनवण्याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थही प्रयत्न करत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकही यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक शाळा सध्या डिजिटल बनल्या आहेत. शाळांतील विद्यार्थी स्मार्ट फोनच्या माध्यमातून गृहपाठ, अध्ययन करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अधिक सुलभ होणार आहे. 

गावागावांत डिजिटल शिक्षण 
जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी जिल्ह्यातील लहान-मोठे उद्योजक, सामाजिक संस्था यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सामाजिक उत्तरदायित्वातून डिजिटल शाळांसाठी त्यांनी मदत करीत गावागावातील शाळा डिजिटल केल्या आहेत.

Web Title: In Raigad Education on computers and homework on smartphones; 2 thousand 12 schools became digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.