कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय सज्ज; ५० खाटा राखीव

By वैभव गायकर | Published: December 26, 2023 03:57 PM2023-12-26T15:57:10+5:302023-12-26T15:57:24+5:30

मॉकड्रील द्वारे यंत्रणेचा आढावा, कोरोना काळात रायगड जिल्ह्यातील कोविड रुग्णालय म्हणुन पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता. या काळात हजारो रुग्णांनी याठिकाणी उपचार घेतला.  

In view of Corona, health department is alert, Panvel District Hospital has been reviewed | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय सज्ज; ५० खाटा राखीव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय सज्ज; ५० खाटा राखीव

पनवेल:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.राज्यभरात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर असताना पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालय सतर्क झाले आहे. दि.25 रोजी मॉकड्रीलद्वारे पनवेल उपजिल्हा रुग्णालयात प्रशासनाने कोरोना काळातील परिस्थिती उद्भवल्यास उपाययोजनांचा आढावा घेतला.

कोरोना काळात रायगड जिल्ह्यातील कोविड रुग्णालय म्हणुन पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता. या काळात हजारो रुग्णांनी याठिकाणी उपचार घेतला. दरम्यान पुन्हा एकदा कोविड डोके वर काढत आहे. कोरोनाचा एच1 व्हेरिएंट ने सर्वत्र खळबळ उडाली असताना उपजिल्हा रुग्णालय एक्शन मोडवर आले आहे.रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मधुकर पांचाळ यांच्या उपस्थितीत मॉकड्रील पार पडली. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोविडची परिस्थिती उद्भवल्यास सध्या 50 खाटा याठिकाणी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त 14 व्हेंटीलेटर्स,18 डॉक्टर्स तसेच स्टाफ नर्ससह इतर जवळपास 50 कर्मचारी याठिकाणी कार्यरत आहेत. अद्याप पर्यंत एकही कोरोना रुग्ण पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेला नसल्याची माहिती डॉ मधुकर पांचाळ यांनी दिली.

शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार आम्ही सज्ज झाले आहोत.अद्याप पर्यंत एकही कोरोना रुग्ण दाखल झाला नसला तरी आम्ही कोविड रुग्णांसाठी 50 खाटा सज्ज ठेवल्या आहेत.14 व्हेंटीलेटर्स देखील उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपलब्ध आहेत.- डॉ मधुकर पांचाळ (अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय पनवेल )

Web Title: In view of Corona, health department is alert, Panvel District Hospital has been reviewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.