‘अलिबाग मोटार शो’चे उद्घाटन
By Admin | Published: December 24, 2016 03:23 AM2016-12-24T03:23:56+5:302016-12-24T03:23:56+5:30
‘लोकमत’ आणि ‘सॉलिटेअर इव्हेंट’ प्रस्तुत ‘तिसऱ्या अलिबाग मोटार शो’चे उद्घाटन अलिबागच्या उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह
अलिबाग : ‘लोकमत’ आणि ‘सॉलिटेअर इव्हेंट’ प्रस्तुत ‘तिसऱ्या अलिबाग मोटार शो’चे उद्घाटन अलिबागच्या उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी नागरिकांसह पर्यटकांनी कार पाहाण्याकरिता मोठी गर्दी केली होती.
या वेळी नगरसेवक अनिल चोपडा, अलिबाग ‘मोटार शो’चे संयोजक तथा सॉलिटेअर इव्हेंटचे संचालक गिरीश जैन, संयोजक सहयोगी भावार्थ शाह आदी मान्यवर व विविध कार कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मर्सिडिझ, जॅग्वार, लॅन्डरोव्हर, आॅडी, नेक्सा, आयसुझू, स्कॉडा, फोक्सव्हॅगन, निसान या विदेशी कार आणि हर्ले डेव्हिसन, ट्रायम्स आणि रॉयल इन्फिल्ड या मोटारसायकल्सची उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह यांनी विविध कार आणि मोटारसायकल्सची पाहणी करून माहिती घेतली. एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या कार व मोटारसायकल अलिबागकरांना पाहण्याकरिता व त्यांची तांत्रिक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी या शोचे आयोजन केल्याबद्दल संयोजकांचे शाह यांनी अभिनंदन केले.
हा मोटार शो २५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. टीबीझेड ज्वेलर्स, निशिलिन टायर्स हे असोसिएट पार्टनर, तर रेडीओ पार्टनर रेडीओ मिर्ची असलेल्या ‘अलिबाग मोटार शो’बाबत कार शौकिनांमध्ये उत्सुकता होती, हे प्राप्त फोनकॉल्सवरून लक्षात येत असल्याचे सॉलिटेअर इव्हेंटचे संचालक गिरीश जैन यांनी सांगितले.