अक्षय पात्र फाऊंडेशनच्या 68व्या स्वयंपाकघराचे उदघाटन; शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 09:48 PM2024-01-03T21:48:50+5:302024-01-03T21:48:58+5:30
ना नफा ना तोटा आधारावर अक्षयपात्र काम करीत असून त्यांचे जेवणही अत्यंत दर्जेदार असते.
पनवेल: अक्षय पात्र फाऊंडेशच्या देशातील 68 व्या स्वयंपाक घराचे उदघाटन दि. 3 रोजी पनवेल मधील साईनगर याठिकाणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल मधील हे नवीन सेंट्रलाइज्ड किचन आहे.देशातील 68 वे आणि महाराष्ट्रातील हे चौथे स्वयंपाकघर आहे.
याद्वारे 70 शाळांमधील वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जाणार आहे. या उदघाटन सोहळ्याला उद्घाटनाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अक्षय पात्र फाऊंडेशन अध्यक्ष अमितासना दासा, श्रीधर वेंकट उपस्थित होते.पनवेल मधील या स्वयंपाक घरात दररोजवीस हजारांचे जेवण तयार केले जाणार आहे. सुरुवातीला दहा माध्यान्ह भोजन महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना दिले जाईल.अक्षयपात्र संस्थेचे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे असे हे स्वयंपाक घर असणार आहे.यावेळी बोलताना केसरकर यांनी अक्षयपात्र संस्थेचे कौतुक केले.
ना नफा ना तोटा आधारावर अक्षयपात्र काम करीत असून त्यांचे जेवणही अत्यंत दर्जेदार असते.पनवेल मधील या स्वयंपाक घरात शंभर महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने त्याबाबत देखील केसरकर यांनी संस्थेचे अभिनंदन केले.अक्षयपात्र संस्थेचे कौतुक स्वतः देशाचे पंतप्रधान मोदी यांनी केले असल्याने त्यापेक्षा आणखी मोठी पोचपावती काय असेल असेहि गौरोद्गार यावेळी केसरकर यांनी काढले. चौकट - दोन कोटी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न राज्यात दोन कोटी मुले शाळेत शिक्षण घेत आहेत.त्यांचा दफ्तरांचा ओझा कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि आधुनिक शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.स्वच्छ शाळा ,सुंदर शाळा हा उपक्रम आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनात राबवत असल्याचे केसरकर यांनी सांगितले.