शहरं
Join us  
Trending Stories
1
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
2
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
3
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
4
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
5
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
6
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
7
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
8
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
9
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
10
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
12
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
13
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
14
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
15
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
16
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
17
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
18
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
19
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
20
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos

कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते उद्घाटन

By निखिल म्हात्रे | Published: November 22, 2023 6:59 PM

रायगड विभाग गेली तीन वर्षे अव्वल राहिला आहे, त्याबद्दलही तटकरे यांनी रायगड पोलीस विभागाचे अभिनंदन करून सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

अलिबाग - रायगड पोलीस विभागातर्फे आयोजित 48 व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा आैपचारिक उद्घाटन समारंभ बुधवारी (22 नोव्हेंबर रोजी) राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सायंकाळी 4 वाजता येथील पोलीस मुख्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पोलीस आणि खेळाचे अतुट नाते आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणे महत्वाचे आहे. राज्याची महिला व बावविकास मंत्री म्हणून सर्व पोलीस ठाण्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केले. 

या उद्घाटन समारंभास जिल्हाधिकारी योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भरत बास्टेवाड, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, रघुजीराजे आंग्रे आदी उपस्थित मान्यवर उपस्थित होते.48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा सोमवारपासून अलिबागमध्ये सुरू झाली असून आज बुधवारी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाले. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आदिती तटकरे म्हणाल्या की, पोलीस आणि क्रीडा क्षेत्र यांचे अतुट नाते आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेपासून कर्मचाऱ्यांचा मैदानाशी संबंध येतो. कर्तव्य बजावताना आपली खेळाची आवड जोपासणे, काैटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे आणि शारीरिकदृष्टया तंदुरुस्त राहण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची ही धडपड काैतुकास्पद आहे. पोलिसांच्या मागील स्पर्धेत रायगड विभागाला विजेते पद मिळाल्याने यावर्षी रायगडकडे यजमान पद आले आहे. रायगड विभाग गेली तीन वर्षे अव्वल राहिला आहे, त्याबद्दलही तटकरे यांनी रायगड पोलीस विभागाचे अभिनंदन करून सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले. या समारंभास पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, खेडाळू, पंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या स्पर्धेत नवी मुंबई आयुक्तालय, मिरा भाईंदर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर पोलीस विभागाचे संघ सहभागी झाले आहेत.