जेएनपीएत एमएसईडीसीएल वितरण फ्रँचायझीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2022 10:05 PM2022-12-23T22:05:19+5:302022-12-23T22:05:48+5:30
केंद्रीय मंत्रालयाच्या मेरीटाईम इंडिया व्हिजन २०३० च्या पुढाकाराअंतर्गत कार्यान्वित करण्यात येत असलेला जेएनपीएचा आणखी एक हरित प्रकल्प आहे.
-मधुकर ठाकूर
उरण: जेएनपीए हे राज्य डिस्कॉम एमएसईडीसीएलसोबत एमओयू मार्गाने वितरण फ्रँचायझी (डीएफ) बनणारे पहिले मोठे बंदर ठरले असुन ही एक मोठी उपलब्धी आहे.यामुळे जेएनपीए डीएफ क्षेत्रातील वीज ग्राहकांना हरित उर्जा स्त्रोतांकडून वीज पुरवठ्याचा लाभ घेता येईल.” अशी प्रतिक्रिया जेएनपीए अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केली.जेएनपीए बंदराने बुधवारी एमएसईडीसीएल कार्यान्वित करण्यात आलेल्या वितरण फ्रँचायझीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्रालयाच्या मेरीटाईम इंडिया व्हिजन २०३० च्या पुढाकाराअंतर्गत कार्यान्वित करण्यात येत असलेला जेएनपीएचा आणखी एक हरित प्रकल्प आहे."जीएसएम व आरएफ आधारित रिमोटली कंट्रोल्ड डिम करण्यायोग्य स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीमचे कार्यान्वित करणे हा एक पथदर्शी प्रकल्पाचा हेतू आहे.यामुळे जेएनपीए डीएफ क्षेत्रातील वीज ग्राहकांना हरित उर्जा स्त्रोतांकडून वीज पुरवठ्याचा लाभ घेता येणार आहे.तसेच जेएनपीएने महावितरणच्या आवश्यकतेनुसार इलेक्ट्रिकल नेटवर्क सुधारणेचे काम केले आहे.
कनेक्शन पॉईंट्सवर स्मार्ट मीटरिंग स्थापित केले. यात बीओटी ऑपरेटर आणि जेएनपीए डीएफ क्षेत्रातील इतर एचटी ग्राहकांचा समावेश आहे ते आता महावितरणचे थेट ग्राहक असल्याचे संजय सेठी यांनी उद्घाटन प्रसंगी स्पष्ट केले. या उद्घाटन प्रसंगी जेएनपीए टाउनशिप येथे स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, एचओडी आणि जेएनपीएमधील सर्व टर्मिनल ऑपरेटर विभागाचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.