अवकाळी पावसाने पाओलीचे भाव घसरले, शेतकरी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:05 AM2017-12-07T00:05:26+5:302017-12-07T00:05:35+5:30
तालुक्यातील शेतक-यांना निसर्गाने फसवल्याने भाताचे पीक नुकसानीत गेल्याने आता आशा होती ती गवत, पाओलीतून मिळणा-या थोड्या फार आधाराची.
राहुल वाडेकर
विक्रमगड : तालुक्यातील शेतक-यांना निसर्गाने फसवल्याने भाताचे पीक नुकसानीत गेल्याने आता आशा होती ती गवत, पाओलीतून मिळणा-या थोड्या फार आधाराची. मात्र, ओखी वादळामुळे पडलेल्या पावसामुळे शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यात व्यापाºयांनाही फटका बसल्याने सगळा धंदाच चौपट झाल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील आपटी, आलोंडे, झडपोली, केव, यशवंतनगर, गडदे, दादडे, उपराळे अशा विविध भागामध्ये गवत पाओलीची खरेदी करणाºया वखारी सुरु झाल्या आहेत. या खरेदी विक्र ीला जोर आला असला तरी गवताला ४००० रु टन भाव दण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. विक्र मगड ही गवत खरेदी विक्रीची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे वाडा, जव्हार, पालघर, डहाणू तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी इकडे येतात.
या वर्षी मात्र पाऊस लांबल्याने व अवकाळी पावसामुळे वखारींची संख्या कमी होऊन अंदाजे १५ ते २० वखारी सुरु आहेत. या वखारीत आलेल्या गवत व पाओलीला प्रेस द्वारे तारेने ६ ते ७ ताणाच्या गाठ्या बनवून वखार मालक मुबई, वसई, नालासोपारा, ठाणे, गोरेगाव भागातील दुध डेअरींना विक्र ीसाठी पाठविल्या जातात. मात्र, या गठ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने वखारी मालक मागणी नुसार वखारीत साठवणूक करून ठेवत असतात. पावसाळ्यात गठ्याना मोठी मागणी व योग्य भाव असल्याने वखार मालक दुध डेअरींना विक्र ी करतात.या वर्षी गाठ्यांनाच योग्य भाव न मिळाल्याने आम्हाला तोट्यात जावे लागेल असे वखारी मालकांचे म्हणणे आहे. या पूर्वी आदिवासी विकास महामंडळाने गवत-पाओलीला एका-धिकारी खरेदी केली होती. परंतु त्यांना त्यामध्ये योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही खरेदी केंद्रे बंद करण्यात आली.
वखारीमध्ये व गवत रचण्यासाठी प्रेसमध्ये गठ्या रचण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूरांची आवश्यकता लागते असते त्यामुळे ऐका वखारीत ४० ते ५० मजुरांना रोजगार मिळतो. तालूक्यात १५ ते २० वखारी सुरु असून अंदाजे १२०० मजुरांना या वखारी द्वारे रोजगार मिळतो आहे. त्याच प्रमाणे गवत-पाओली ने - आन करण्यासाठी बैलगाडीचा उपयोग केला जात असून बैलगाडीमध्ये पाओली आणणाºया एका फेरीला १५० ते २०० रु पये भाडे वखारी मालक देत असतात. त्यामुळे बैलगाडीवाले भाडयाच्या रूपात दिवसकाठी ४ ते ५ फेरीत ८०० ते १००० रु पये मिळवतात. तालुक्यातील या गवत -पाओली वखारी मुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे.
इतर तालुक्याच्या तुलनेत कमी भाव
तालुक्यात व्यापारी शेतकºयांना एक टन पाओलीला २४०० ते २६०० रु पये भाव देत आहेत. गेल्या वर्षी हाच भाव तीन हजार ते बत्तीसशे रुपये होता. या वर्षी पाऊस लांबल्याने तसेच अवकाळी पावसामुळे पाओली कुजल्याने भाव घसरला असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. दरम्यान, वाडा तालुक्यातील काही भागात पाओलीला २८०० ते ३००० रु पये टन भाव दिला जात आहे. पालघर जिल्हातील काही वखारीनवर पाओलीला ३००० रु पये भाव आहे.