मराठा सर्वेक्षण करताना शिक्षिकेवर उगारला कोयता, अलिबाग श्रीबागमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 10:26 AM2024-02-01T10:26:22+5:302024-02-01T10:26:39+5:30
Crime News: मराठा आणि खुल्या वर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करताना अनेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. अलिबागमधील महिला शिक्षिका सर्वेक्षण करताना एक व्यक्ती त्यांच्या अंगावर कोयता घेऊन धावून आला.
अलिबाग : मराठा आणि खुल्या वर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करताना अनेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. अलिबागमधील महिला शिक्षिका सर्वेक्षण करताना एक व्यक्ती त्यांच्या अंगावर कोयता घेऊन धावून आला. याबाबत तक्रार दाखल झाली नसली तरी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलिबाग शहरातील श्रीबाग येथे एका कुटुंबाच्या घरी महिला शिक्षक सर्वेक्षणासाठी गेली होती. त्यावेळी घरातील मद्य प्यायलेल्या व्यक्तीने कोयत्याने तिला दटावून सर्वेक्षण करण्यास नकार दिला. या घटनेने महिला शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय कर्मचारी हे शासनाच्या आदेशाने काम करीत आहेत. मात्र, त्यांना अनेक कटू अनुभव येत आहेत. शहरातील ब्राह्मण, मुस्लीम, ख्रिश्चन तसेच इतर खुल्या वर्गातील कुटुंबीय सर्वेक्षण करण्यास नकार देत असल्याचे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी म्हटले आहे. तरीही सर्वेक्षण युद्धपातळीवर करून पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा व खुल्या वर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची ३१ जानेवारी ही अंतिम तारीख होती. यामध्ये मुदतवाढ देऊन २ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण करायचे आहे.