माथेरानची मिनी ट्रेन अद्याप सुरू नसल्याने गैरसोय, पर्यटकांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:18 AM2020-10-30T00:18:19+5:302020-10-30T00:19:35+5:30

Matheran News : काही दिवसांपूर्वी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी मध्य रेल्वेच्या डीआरएम (व्यवस्थापक) यांची भेट घेऊन शटल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, रेल्वेने याबाबत अद्यापही तत्काळ अंमलबजावणी केलेली नाही. 

Inconvenience due to Matheran mini train is not running yet, dissatisfaction of tourists as | माथेरानची मिनी ट्रेन अद्याप सुरू नसल्याने गैरसोय, पर्यटकांची नाराजी

माथेरानची मिनी ट्रेन अद्याप सुरू नसल्याने गैरसोय, पर्यटकांची नाराजी

Next

माथेरान - लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरातील रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, माथेरानच्या मिनी ट्रेनची शटल सेवा अद्याप सुरू झाली नाही. सप्टेंबर महिन्यात ई-पासची अट हटविण्यात आल्यानंतर पर्यटकांचा ओघ माथेरानला हळूहळू सुरू झाला. मात्र, रेल्वेची अमन लॉज ते माथेरान शटल सेवा अद्याप सुरू न झाल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना दस्तुरी नाक्यापासून गावात येण्यासाठी आपल्या सामानासह प्रवास करताना अत्यंत गैरसोयीचे होत आहे. अपेक्षेप्रमाणे पर्यटक माथेरानला येत नाहीत त्यामुळे व्यवसायाला गती प्राप्त होत नाही. यामुळे हॉटेल मालक, लॉजिंग, घोडेवाले, रिक्षावाले, दुकानदार यांच्यासह श्रमिक वर्गसुद्धा चिंतित आहे. 

काही दिवसांपूर्वी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी मध्य रेल्वेच्या डीआरएम (व्यवस्थापक) यांची भेट घेऊन शटल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव अभय यावळकर यांनी तत्काळ शटल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, रेल्वेने याबाबत अद्यापही तत्काळ अंमलबजावणी केलेली नाही. 

लॉकडाऊनच्या दरम्यान देशभरातील गाड्या बंद असतानादेखील संनियंत्रण समितीने आदेश देताच मालवाहतुकीची गाडी सुरू करण्यात आली होती. विशेष म्हणजे मालवाहतूक गाडीची मागणी नसतानादेखील ती सुरू करण्यात आली होती. येणारे पर्यटक हे खऱ्या अर्थाने नेरळ ते माथेरान या मिनि ट्रेन प्रवासाच्या औत्सुक्याने येत असतात. हा मार्गसुद्धा उत्तम प्रकारे दुरुस्त करण्यात आलेला असताना केवळ रेल्वेच्या अधिकारी वर्गाची मानसिकता नसल्याने नेरळ-माथेरान मिनि ट्रेन सेवा उपलब्ध होऊ शकत नाही. निदान चार फेऱ्या नेरळ- माथेरानदरम्यान असाव्यात जेणेकरून इथे पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येईल. याच माध्यमातून रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नातसुद्धा निश्चित वाढ होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मिनि ट्रेन सेवा लवकरच सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला देण्याची मागणी व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष दीपक शाह यांनी केली आहे.

   

Web Title: Inconvenience due to Matheran mini train is not running yet, dissatisfaction of tourists as

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.