रेवसऐवजी चुकून कावाडे ग्रामपंचायतीचा उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 06:57 AM2018-03-08T06:57:01+5:302018-03-08T06:57:01+5:30
अस्तित्वात नसलेल्या कावाडे या ग्रामपंचायतीच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी रायगड जिल्हा परिषदेने खर्च केला आहे. या प्रकरणात तक्र ार झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग चक्र ावून गेला. तक्रारदाराला उत्तर देताना रेवस ग्रामपंचायतीऐवजी चुकून कावाडे ग्रामपंचायत अशी टायपिंग मिस्टेक झाल्याचा खुलासा दस्तुरखुद्द पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन प्रभारी अभियंता एच. एल. भस्मे यांनी केला आहे.
अलिबाग : अस्तित्वात नसलेल्या कावाडे या ग्रामपंचायतीच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी रायगड जिल्हा परिषदेने खर्च केला आहे. या प्रकरणात तक्र ार झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग चक्र ावून गेला. तक्रारदाराला उत्तर देताना रेवस ग्रामपंचायतीऐवजी चुकून कावाडे ग्रामपंचायत अशी टायपिंग मिस्टेक झाल्याचा खुलासा दस्तुरखुद्द पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन प्रभारी अभियंता एच. एल. भस्मे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या कामाचे अंदाजपत्रक तयार करणारे तत्कालीन उपअभियंता माळी यांनी सुमारे २० ठिकाणी कावाडे ग्रामपंचायत असा उल्लेख केलेला आहे.
पोषण आहार घोटाळा, बनावट सह्यांचा घोटाळा आणि आता चक्क टायपिंग मिस्टेक घोटाळा उघड झाला आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये एकामागून एक घोटाळे, गैरव्यवहार चव्हाट्यावर येत असल्याने जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन होताना दिसत आहे. अलिबागच्या पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन उपअभियंता आर. एस. माळी यांनी अस्तित्वात नसलेल्या कावाडे ग्रामपंचायतीच्या नावे अंदाजपत्रक तयार करून त्याच ग्रामपंचायतीच्या नावे एकाच कामाची दोन अंदाजपत्रके तयार करून तब्बल दीड लाख रुपयांच्या सरकारी निधीचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची मागणी अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.
ठाकूर यांच्या तक्र ार अर्जाला उत्तर देताना पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता एच. एल. भस्मे यांनी कामाचे मूल्यांकन करते वेळी टायपिंग मिस्टेकने रेवस ग्रामपंचायतीऐवजी कावाडे ग्रामपंचायत असे चुकून झाले होते. तसेच बिले देण्यामध्ये गैरव्यवहार झाला नसल्याचे कळविले आहे. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार टायपिंग मिस्टेक एका ठिकाणी होऊ शकते, दोन ठिकाणी होऊ शकते; परंतु तत्कालीन उप अभियंता माळी यांनी जी अंदाजपत्रके तयार केली आहेत. त्यामध्ये जवळ जवळ २० ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या कावाडे ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे. या अंदाजपत्रकावर जावक क्र मांक नाही, तारीख नाही, तरीही या कामांचे दीड लाख रुपयांचे बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. अंदाजपत्रकानुसार ही कामे शौचालयांच्या पाणीपुरवठ्यासाठी केले असल्याचे दिसून येते. ठाकूर यांना रायगड जिल्हा परिषदेने जे उत्तर दिले आहे. त्यामध्ये हे काम कावाडे गावासाठी अंतर्गत पाइपलाइन टाकणे, असे असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता एच. एल. भस्मे यांनी काहीही खात्री न करता माजी आमदार यांना धडधडीत खोटी माहिती पुरविली असल्याचे स्पष्ट होते. संबंधित अधिकारी खोटी माहिती देऊन नेमके कोणाचे हित साध्य करणार आहेत, असा प्रश्न ठाकूर यांनी केला आहे.
ठाकूर यांनी आज पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व खोटी माहिती पुरविणाºया सर्व संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
१माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रकाश खोपकर यांची भेट घेतली. रेवस ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबाबत ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी केली. या वेळी ठाकूर यांच्यासोबत रेवस ग्रामपंचायतीचे सदस्य मच्छींद्र पाटील, काँग्रेसचे शिक्षक सेल अध्यक्ष ज. गो. पाटील, बाळाराम म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
२दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे शाखा अभियंता सुधीर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी तक्र ार केली आहे. त्यांच्या तक्र ारीवर गुरु वारी प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर आणि उपअभियंता जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
३तत्कालीन उप अभियंता माळी यांनी जी अंदाजपत्रके तयार
केली आहेत. त्यामध्ये जवळ जवळ २० ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या कावाडे ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे. या अंदाजपत्रकावर
जावक क्र मांक नाही, तारीख नाही, तरीही या कामांचे दीड लाख
रुपयांचे बिल ठेकेदाराला अदा करण्यात आलेले आहे. अंदाजपत्रकानुसार
ही कामे शौचालयांच्या पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आले असल्याचे दिसून येते.