श्रीवर्धन तालुक्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:16 AM2017-09-01T01:16:47+5:302017-09-01T01:16:57+5:30

तालुक्यात गुन्ह्यांची मालकी जोर धरत आहे. किरकोळ गुन्ह्यासोबत गंभीर गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Increase in criminal cases in Shrivardhan taluka | श्रीवर्धन तालुक्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

श्रीवर्धन तालुक्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

Next

संतोष सापते 
श्रीवर्धन : तालुक्यात गुन्ह्यांची मालकी जोर धरत आहे. किरकोळ गुन्ह्यासोबत गंभीर गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकताच महिला वर्गाने पोलीस यंत्रणेच्या विरोधात काढलेल्या मोर्चाने श्रीवर्धनचे समाज मन ढवळून
निघाले आहे. मात्र, यामुळे अनेक प्रश्न समोर आले आहेत. सर्वसामान्य व्यक्तीचे संरक्षण पोलीस यंत्रणा करू शकत नाही? चोरीची मालिका निरंतर चालू आहे तरी पोलीस काहीच करत नाहीत का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
श्रीवर्धन पोलिसांनी १४८ घडलेल्या गुन्ह्यांपैकी १३१ गुन्हे उघड केले. उर्वरित १८ गुन्ह्यांचा शोध चालू आहे. सध्याच्या घरफोडीचा विचार करता श्रीवर्धनची आजची लोकसंख्या व भौगोलिक रचना महत्त्वाची आहे. संपूर्ण शहरात नारळ व सुपारीच्या वाड्या मोठ्या स्वरूपात आहेत, तसेच बंद घरांची संख्या काही भागात जास्त आहे. पोलीस यंत्रणेने मुख्य रस्त्यावर गस्त दिली तरीसुद्धा नारळ-सुपारीच्या वाड्यांचा व रस्त्याचा वापर भुरटे चोर करतात. श्रीवर्धन शहरात ४७६८ घरे आहेत. शहराची लोकसंख्या १५१२३ असल्याची माहिती नगरपालिकेकडून मिळाली.
श्रीवर्धन पोलीस ठाण्यात चार अधिकारी ५१ कर्मचारी मंजूर असून, प्रत्यक्षात हजर पोलीस अधिकारी २, तर पोलीस कर्मचारी ३६ आहेत. अत्यावश्यक कामगिरीकरिता नेमण्यात येणारी संख्या २७ तर शिल्लक फक्त ५ आहेत.
श्रीवर्धनच्या लोकसंख्येचा विचार करता पोलीस यंत्रणेचे मनुष्यबळ फारच कमी असल्याने येथे पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
श्रीवर्धनमधील जनतेने भयमुक्त राहावे, चोर लवकरच पकडले जातील, महिलावर्गाने संविधानाने दिलेल्या अधिकारक्षेत्राचा वापर करत काढलेल्या मोर्चांचा व त्यांच्या भावनांचा मी आदर करतो, असे श्रीवर्धन पोलीस स्टेशन परशुराम कांबळे यांनी सांगितले असून, चोरीच्या घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Web Title: Increase in criminal cases in Shrivardhan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा