जिल्हा रुग्णालयात मनोरुग्णांच्या संख्येत वाढ; वृद्धांची संख्याही लक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:00 AM2020-10-12T00:00:27+5:302020-10-12T00:00:36+5:30

रायगडमध्ये तीन वर्षांत स्किझोफ्रेनियाचे दोन हजार २९७ रुग्ण

Increase in the number of psychiatric patients in the district hospital; The number of elderly is also significant | जिल्हा रुग्णालयात मनोरुग्णांच्या संख्येत वाढ; वृद्धांची संख्याही लक्षणीय

जिल्हा रुग्णालयात मनोरुग्णांच्या संख्येत वाढ; वृद्धांची संख्याही लक्षणीय

googlenewsNext

निखिल म्हात्रे 

अलिबाग : नैराश्य आणि तुटत चाललेल्या संवादामुळे गेल्या तीन वर्षांपासून स्किझोफ्रेनियाचे दोन हजार २९७ रुग्ण उपचारासाठी रायगड जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १८ ते ४४ वयोगटांतील रुग्णांची संख्या सर्वात जास्त असल्याचे मनोरुग्ण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. या रुग्णांत वृद्धांची संख्याही लक्षणीय आहे.
गेल्या काही वर्षांपासून यातील स्किझोफ्रेनिया या आजाराच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. १ एप्रिल, २०१७ ते ३१ मार्च, २०१८ या कालावधीत १ हजार ४४ रुग्णांनी, तर १ एप्रिल, २०१८ ते ३१ मार्च, २०१९ या कालावधीत १ हजार ६५ रुग्ण उपचारासाठी मनोरुग्णालयात आल्याची नोंद आहे, तर या वर्षी १ एप्रिल, २०१९ ते ३१ मे, २०१९ या कालावधीत १८८ एवढे रुग्ण आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गेल्या तीन वर्षा$ंत २ हजार २९७ इतके रुग्ण उपचारासाठी आले असून, यात पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे, तर रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात आहे. नैराश्य, अश्लील चित्रफिती पाहणे, तुटत चाललेले संवाद, यामुळे हे आजार बळावत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आजारातील केवळ २० टक्के रुग्ण पूर्णत: बरे होत असल्याचेही डॉक्टर म्हणाले.

काय आहे स्किझोफ्रेनिया आजार? : स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असून, मेंदूचा विकारही आहे. मेंदूमधील डोपामिन या रसायनाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. जनुकांमधील बदल, तसेच गर्भवती महिलेला ताप अथवा कुपोषित असल्यास बाळाला हा स्किझोफ्रेनिया आजार होण्याची जास्त शक्यता असते. स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णांना विचार, भावना आणि वागणूक यात दोष निर्माण होतो. या आजारामध्ये व्यक्तींचा वास्तवाशी संबंध तुटतो आणि तो माणूस स्वत: भ्रामक आणि आभासी जगामध्ये जगायला लागतात. रुग्णाचा मनावरील ताबा सुटतो. आजाराच्या स्वरूपानुसार त्यांच्यावर उपचार करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण विभागामार्फत रुग्णांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. रुग्णालयात तरुणांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. - डॉ. अमोल भुसारे, मानसोपचार तज्ज्ञ, रायगड जिल्हा रुग्णालय

Web Title: Increase in the number of psychiatric patients in the district hospital; The number of elderly is also significant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.