जलयुक्त शिवार योजनेमुळे साठ्यात वाढ

By admin | Published: September 28, 2016 02:47 AM2016-09-28T02:47:44+5:302016-09-28T02:47:44+5:30

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असले तरी महाड व पोलादपूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी हा पाऊस वरदान

Increase in the stock due to irrigation system | जलयुक्त शिवार योजनेमुळे साठ्यात वाढ

जलयुक्त शिवार योजनेमुळे साठ्यात वाढ

Next

- जयंत धुळप,  अलिबाग
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असले तरी महाड व पोलादपूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे. १२ गावांतील १४५ विविध कामांच्या माध्यमातून तब्बल २८३ टीसीएम (हजार घनमीटर) अतिरिक्त जलसाठ्याची निर्मिती झाली आहे.
महाड तालुक्यातील पांगारी, विन्हेरे, नातोंडी, करंजाडी, चांढवे खुर्द, मुमुर्शी, कोळोसे व वरंध तर पोलादपूर तालुक्यातील सडवली, कोतवाल,खुर्द फणसकोंड, रानवडी बुद्रुक अशी बारा गावे जलसमृध्द झाली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात जलदुर्भिक्षावर मात करता येणार आहे.
महाड, पोलादपूर या दोन तालुक्यात गेल्या दोन वर्षात जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत एकूण १४५ कामे पूर्ण झाली आहेत. यात महाड तालुक्यातील पांगारी, विन्हेरे, नातोंडी, करंजाडी, चांढवे खुर्द, मुमुर्शी, कोळोसे व वरंध या आठ गावांसाठी ही योजना राबविण्यात आली. या गावांमध्ये सलग समतर चर-४३, अनघड दगडी बांध-९, वळण बंधारे-२, जुनी भातशेती दुरुस्ती-९,सिमेंट नाला बांध-८ अशी एकूण ७९ कामे करण्यात आली. त्यामुळे या गावांच्या क्षेत्रात २११ टीसीएम अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. महाड तालुक्यातील पूर्ण झालेल्या कामांसाठी १ कोटी ४७ लाख ७० हजारांचा निधी लागला आहे.
पोलादपूर तालुक्यातील सडवली, कोतवाल, खुर्द फणसकोंड, रानवडी बुद्रुक या चार गावांसाठी योजनेंतर्गत सलग समतर चर निर्मिती आणि जुनी भातशेती दुरु स्तीची ७९कामे करण्यात आली. या कामामुळे ७२ टीसीएमअतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला. महाड व पोलादपूर या दोन्ही तालुक्यात मिळून सलग समतर चर एकूण ६९ खोदण्यात आले. पोलादपूर तालुक्यात ३५ लाख ६५ हजारांचा निधी लागला आहे.
दोन्ही तालुक्यांतील १२ गावांच्या क्षेत्रात पाणी मुरण्याची प्रक्रि या प्रभावी पद्धतीने झाली. विहिरींच्या जलपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच,रब्बी पिकांनाही त्याचा लाभ होईल, असे निरीक्षण कृषी विभागाचे आहे.

सहा गावांचा समावेश
चालू आर्थिक वर्षात महाड तालुक्यातील कुंभेशिवथर, रेवतळे व मांडले-पारवाडी अशा तीन तर पोलादपूर तालुक्यातून मोरसंडे, केवनाळे, पळचिल अशा तीन या गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे.

कामाची प्रगती वेबसाईटवर
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोणतेही काम सुरू करण्यापूर्वीची परिस्थिती, काम सुरूअसताना,आणि कामाच्या पूर्ततेनंतरच्या परिस्थितीची सर्व छायाचित्रे अक्षांश-रेखांशासह वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहेत.

Web Title: Increase in the stock due to irrigation system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.