गुंतवणूकदारांची वाढली चिंता; रिफायनरी प्रकल्पाच्या भवितव्यामुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:30 PM2019-07-22T23:30:37+5:302019-07-22T23:30:58+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची मध्यंतरी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती.

Increased concerns of investors; | गुंतवणूकदारांची वाढली चिंता; रिफायनरी प्रकल्पाच्या भवितव्यामुळे संभ्रम

गुंतवणूकदारांची वाढली चिंता; रिफायनरी प्रकल्पाच्या भवितव्यामुळे संभ्रम

Next

आविष्कार देसार्ई 

अलिबाग : बहुचर्चित असणारा रिफायनरी प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार की रत्नागिरी जिल्ह्यात आल्या वाटेने पुन्हा परत जाणार या शक्यतेने मात्र गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पाचे बस्तान बसले नाही तर रायगडच्या विकासाला खीळ बसणार आहेच शिवाय ‘व्हेंडर डेव्हलपमेंटवर’ विपरीत परिणाम होऊन आधीच हाताला तेल लावून बसलेल्या गुंतवणूकदारांसह काही राजकीय नेत्यांना हात चोळत बसण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचे सध्या चित्र आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची मध्यंतरी मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू होती. काही महिन्यांपूर्वी अलिबाग, रोहा, मुरुड आणि म्हसळा तालुक्यातील ४० गावातील जमीन संपादित करून तेथे औद्योगिक टाऊनशिप उभारण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणीच उभारला जाणार अशी अटकळ लावली जात होती. त्यामुळे विविध गुंतवणूकदारांना या ठिकाणी गुंतवणुकीचा चांगला पर्याय समोर आला. त्यानुसार या ठिकाणच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांनी बऱ्यापैकी उसळी मारण्यास सुरुवात केली होती, मात्र याच कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चे निघू लागले. रिफायनरी प्रकल्प हा नाणारमध्येच करावा अशी मागणी आता रत्नागिरी जिल्ह्यात जोर धरत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प होण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार आणि काही राजकीय नेत्यांच्या चिंतेमध्ये भर घातली आहे.

हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात आल्यास रायगडवासीयांना विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यापासून ते प्रकल्पाच्या उद्घाटनाची फीत कापून झाल्यानंतर भरभराटीला येणाºया व्हेंडर डेव्हलपमेंटवर (विक्रेता विकास) विपरीत परिणाम होणार असल्याचे बोलले जाते. विक्रेता विकासाच्या साखळीमध्ये विविध कामगार, ठेकेदार, बांधकाम साहित्य पुरवणारे, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, हॉटेल व्यावसायिक, मनुष्यबळ पुरवणारे, वकिली व्यवसाय करणारे, कर सल्लागार, हॉस्पिटल, छोटी-मोठी किराणा विक्रीची दुकाने अशा घटकांचा समावेश होतो. त्यामुळे यातील सर्वच उद्योग जन्माला येण्याआधीच भुईसपाट होणार असल्याने उद्योग जगतात चिंतेचे ढग दाटले आहेत.

प्रकल्प न आल्याने काही राजकीय नेत्यांना ठेके मिळणार नाहीत तसेच जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातही त्यांना आता हात धुवून घेता येणार नाही. त्यामुळे हात चोळत बसण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची जोरदार चर्चा आहे.
सर्वच क्षेत्रामध्ये सावध पावले

प्रकल्प या ठिकाणी आला नाही तर गुंतवणूकदार आणि राजकीय नेत्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागणार आहेच शिवाय प्रकल्पावर आधारित सर्व घटकांना फटका बसणार असल्याचे दिसून येते. प्रकल्प येण्याच्या शक्यतेने जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी स्वारस्य दाखवणाऱ्यांनी जमिनीची मोजणी, सातबारा उतारा, सर्च रिपोर्ट, जागेचे नकाशे याची जमवाजमव करायला सुरुवात केली होती. मात्र आता रिफायनरी प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत जाणार या शक्यतेने सर्वच क्षेत्रामध्ये सावध पावले टाकण्यात येत असल्याचे बोलले जाते.

तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या भारतातील तीन पेट्रोलियम कंपन्या आणि सौदी अरेबियातील अरम्को कंपनी रिफायनरी प्रकल्प उभारणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपनीचा सहभाग असल्याने स्वाभाविकच रायगड जिल्ह्यातील जमिनींना कोट्यवधी रुपयांचा दर मिळणार आहे. परंतु लवकरच येथे नवीन प्रकल्प येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना निराश होण्याचे अजिबात कारण नसल्याचे एका गुंतवणूकदार कंपनीच्या अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Increased concerns of investors;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.