मोतीबिंदूच्या रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 06:52 AM2018-05-08T06:52:17+5:302018-05-08T06:52:17+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांच्या आॅपरेशनसाठी ‘स्मार्ट ओटी’ उभारण्यात येत आहे. मात्र स्मार्ट ओटीचे काम संथगतीने सुरु असल्याने नियमितपणे होणाऱ्या मोतीबिंदूच्या आॅपरेशनला ब्रेक लागला आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग - जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांच्या आॅपरेशनसाठी ‘स्मार्ट ओटी’ उभारण्यात येत आहे. मात्र स्मार्ट ओटीचे काम संथगतीने सुरु असल्याने नियमितपणे होणाऱ्या मोतीबिंदूच्या आॅपरेशनला ब्रेक लागला आहे. मोतीबिंदूचे आॅपरेशन करणाºयांच्या प्रतीक्षा यादीने सुमारे १७२ चा आकडा पार केल्याचे बोलले जात आहे.
रुग्णांना अत्याधुनिक सुविधा देण्याचा जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाचा निर्णय स्तुत्य असला तरी, मोतीबिंदूच्या आॅपरेशनची पर्यायी व्यवस्था माणगाव येथील सरकारी रुग्णालयात करण्यात आल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे. लवकरात लवकर स्मार्ट ओटीचे काम पूर्ण करुन रुग्णांच्या डोळ््यापुढील अंधकार दूर करावा, अशी मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे. याच ठिकाणी महत्त्वाची सर्वच सरकारी कार्यालये, जिल्हा न्यायालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पोस्ट आॅफिस, जिल्हा परिषद यासह अन्य कार्यालयेही अलिबागलाच आहेत. त्याचप्रमाणे अलिबाग येथे जिल्हा सरकारी रुग्णालयही कार्यरत आहे. जिल्ह्याच्या कानाकोपºयातून गोर-गरीब रुग्ण मोठ्या संख्येने अलिबागच्या सरकारी रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येत असतात. जिल्हा सरकारी रुग्णालयामध्येच डोळ््यांचा विभागही आहे. डोळ््यांची समस्या असलेले रुग्ण येथे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामध्ये बहुसंख्येने मोतीबिंदूच्या आॅपरेशनसाठी आलेले असतात. नेत्र विभागात तज्ज्ञ डॉक्टर आहेत, परंतु रुग्णांना आवश्यक असणारे सुसज्ज असे अत्याधुनिक आॅपरेशन थिएटर नव्हते. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी डोळ््यांच्या विभागासाठी स्वतंत्र एक स्मार्ट ओटी असावी यासाठी अलिबाग सरकारी रुग्णालयाच्या परिसरातच ती उभारण्याचे ठरले. त्यानुसार कामही सुरु झाले. परंतु काम संथगतीने सुरु असल्याने मोतीबिंदूचे आॅपरेशन होत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. काम सुरु करुन किमान तीन महिन्यांचा कालावधी होत आला आहे. त्यामुळे मोतीबिंदूचे आॅपरेशन करणाºयांची वेटिंग लिस्ट १७२ वर पोचली आहे. ओटीचे काम कधी होईल आणि आपले आॅपरेशन एकदाचे कधी पार पडेल याच विंवचनेत रुग्ण आहेत.
नेत्र विभागाचे काम सुरु आहे. याची माहितीही रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन दिली जात नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये नाराजीचा सूर आहे.
संसर्ग टाळण्यासाठी अद्ययावत यंत्रणा
नेत्र विभागामध्ये कोणतीच धूळ, अस्वच्छता नसणे गरजेचे असते. डोळ््याचे आॅपरेशन हे खूप सेंसिटीव्ह असते. आॅपरेशननंतर रुग्णांना संसर्ग होऊ न देणे तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु नेत्र विभागात असलेली ओटी खूपच जुनी झाली होती. तसेच आॅपेरशननंतर संसर्ग होण्याचा धोका वाढला होता. त्यामुळे स्मार्ट ओटी बांधणे गरजेचे होेते. स्मार्ट ओटीही आंतरराष्ट्रीय मानांकनावर आधारित आहे. त्यामुळे रुग्णांना आता थोडा त्रास झाला असेल, परंतु हे त्यांच्याच सुरक्षित सुविधेसाठी केले जात असल्याचेही डॉ. प्रीती प्रधान यांनी स्पष्ट केले.
दरवर्षी सुमारे एक हजार डोळ््यांचे आॅपरेशन केले जातात. स्मार्ट ओटीचे काम सुरु असल्याने सध्या ती बंद आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी माणगावच्या सरकारी रुग्णालयात तातडीची आॅपरेशन करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ. प्रीती प्रधान यांनी सांगितले. मात्र याठिकाणी जाणे काही रुग्णांसाठी गैरसोयीचे आहे.
आयडीएल सिझननेच स्मार्ट ओटी
उन्हाळ््याच्या कालावधीत विशेष करुन रुग्ण आॅपरेशनला पसंती देत नाहीत. या कालावधीत उष्णता खूप असते तसेच शेतकरी, मच्छीमार हे या कालावधीत त्यांच्या कामामध्ये गुंतलेले असतात. आयडीएल सिझननुसारच स्मार्ट ओटीचे काम हाती घेण्यात आले आहे असे नेत्र विभागाच्या डॉक्टर प्रीती प्रधान यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ओटीचे काम पूर्ण झाल्यावर संपूर्ण निर्जंतुकीकरण केले जाईल.त्यानंतरच ओटीचा वापर करता येईल आणि यासाठी अजून एक महिना लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट ओटी म्हणजे काय?
स्मार्ट ओटीलाच मॉड्युलर ओटी असे बोलले जाते. या ओटीमध्ये संपूर्ण स्टील पॅनल बसवलेले असतात. मॉड्युलर फ्लोरिंग, भिंती त्याचप्रमाणे ओटीमध्ये हवा आत येताना तेथे बसवण्यात आलेल्या एअर प्युरीफायिंग सिस्टीममधूनच येते. प्रदूषित हवेला रोखण्यात येते. या ओटीतील लाइटची व्यवस्थाही अत्याधुनिक असते.