पोलिसांच्या मुलांसाठी पुण्यात स्वतंत्र शाळा - सतीश माथूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 02:28 AM2018-06-02T02:28:38+5:302018-06-02T02:28:38+5:30

पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे येथे सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर शाळा सुरु करणार असून नागपूर येथे पोलिसांच्या पाल्यांसाठी होस्टेल उभारणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी शुक्रवारी केली

Independent school in Pune for police children - Satish Mathur | पोलिसांच्या मुलांसाठी पुण्यात स्वतंत्र शाळा - सतीश माथूर

पोलिसांच्या मुलांसाठी पुण्यात स्वतंत्र शाळा - सतीश माथूर

Next

अलिबाग : पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे येथे सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर शाळा सुरु करणार असून नागपूर येथे पोलिसांच्या पाल्यांसाठी होस्टेल उभारणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी शुक्रवारी केली. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात राबविण्यात येणाऱ्या पोलीस कल्याण योजनेबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी पोलीस महासंचालक माथूर यांच्या संकल्पनेतून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पोलीस कल्याण सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस महासंचालक माथूर यांच्या हस्ते करण्यात आला.
माथूर यांनी रायगड जिल्हा पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी जाणून घेण्याकरिता दरबाराचे आयोजन केले होते. पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र दर्शन प्रवास सवलतीच्या सहलीच्या गाडीला पोलीस महासंचालक माथूर यांनी हिरवा झेंडा दाखवला. रायगड पोलीस पेट्रोलपंपाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

Web Title: Independent school in Pune for police children - Satish Mathur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.