क्रिकेटर रोहित शर्मा झाला अलिबागकर; चार एकर जागा केली ९ कोटी रुपयांना खरेदी           

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 06:56 PM2021-12-14T18:56:47+5:302021-12-14T18:59:49+5:30

अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरा जवळील विर्त-सारळ या गावात रोहित शर्माने चार एकर जागेसाठी तब्बल नऊ कोटी रुपये माेजले आहेत.

Indian Cricketer Rohit Sharma became Alibagkar; Purchased four acres of land for Rs. 9 crore | क्रिकेटर रोहित शर्मा झाला अलिबागकर; चार एकर जागा केली ९ कोटी रुपयांना खरेदी           

क्रिकेटर रोहित शर्मा झाला अलिबागकर; चार एकर जागा केली ९ कोटी रुपयांना खरेदी           

googlenewsNext

रायगड- सिने जगतातील अभिनेते-अभिनेत्री तसेच जागतिक दर्जाचे खेळाडू, बडे उद्याेजक यांना अलिबागच्या साैदर्याची भुरळ पडली आहे. काहीच महिन्यापूर्वी सिनेतारका दिपीका पादुकाेण आणि वंडरबाॅय रणविर सिंग यांनी अलिबाग येथे जमिन घेतली हाेती. त्या पाठाेपाठ आता भारतीय संघाचा आघाडीचा खेळाडू राेहित शर्मा देखील अलिबागकर झाला आहे.  राेहीत शर्माने अलिबागमध्ये चार एकर जमिन तब्बल नऊ काेटी रुपयांना खरेदी केली आहे. जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर त्याने माेजक्याच नातेवाईक आणि मित्र परिवारासह जमिनीचे पुजन केले. त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद हाेता.                                                                                                        

अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरा जवळील विर्त-सारळ या गावात रोहित शर्माने चार एकर जागेसाठी तब्बल नऊ कोटी रुपये माेजले आहेत. जमिनीचा खरेदी व्यवहार करण्यासाठी रोहित शर्मा सपत्नीक आज अलिबागच्या दुय्यम निबंधक कार्यालयात आला होता. रोहित शर्मा आल्याचे कळताच त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी माेठ्या संख्येने गर्दी केली होती. 

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि वृषभ पंत हे देखील लवकरच अलिबागकर होणार आहेत. अलिबागमध्येच ते जागा आणि रो हाऊस खरेदी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अलिबाग तालुका हा निसर्गाने नटलेला असल्याने अनेकांना त्याच्या सौंदर्याची भुरळ पडत असते. राजकीय नेते, अभिनेते, उद्योजक, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्टीत व्यक्ती हे अलिबागकर झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अजित आगरकर, विराट कोहली हे अलिबागकर झाले आहेत.            

Web Title: Indian Cricketer Rohit Sharma became Alibagkar; Purchased four acres of land for Rs. 9 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.