शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

मिनीट्रेनच्या ताफ्यात भारतीय बनावटीचे इंजिन

By admin | Published: January 16, 2016 12:27 AM

माथेरान मिनी ट्रेनच्या ताफ्यात नवे इंजिन दाखल झाले आहे. शतक महोत्सव साजरा केलेली नेरळ माथेरान मिनीट्रेन गेली काही वर्षे इंजिने सातत्याने रुळावरून घसरत असल्याने

कर्जत : माथेरान मिनी ट्रेनच्या ताफ्यात नवे इंजिन दाखल झाले आहे. शतक महोत्सव साजरा केलेली नेरळ माथेरान मिनीट्रेन गेली काही वर्षे इंजिने सातत्याने रुळावरून घसरत असल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत होते. मिनीट्रेनच्या नवीन इंजिनासाठी सातत्याने माथेरान नगरपालिका पाठपुरावा करीत होती. कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे माथेरान मिनीट्रेनसाठी नवीन इंजिन घेण्यासाठी निधी देण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे हे इंजिन भारतीय बनावटीचे आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीचे तयार करण्यात आलेले हे इंजिन मुंबई मंडळाच्या परळ येथील कार्यशाळेत गेल्या दीड वर्षाच्या काळात तयार झाले आहे. दुसरीकडे परळ येथील तंत्रज्ञानाच्या कार्यकुशल कामामुळे भारतीय रेल्वेच्या कामगिरीत नवीन भर पडली आहे. शतक महोत्सव साजरा करीत असलेल्या मिनीट्रेनसाठी यापूर्वी जी इंजिने आणण्यात आली, ती सर्व इंजिने परदेशी बनावटीची होती. त्यातील वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची जागा आता डिझेल इंजिनाने घेतली आहे. नेरळ लोको शेडच्या ताफ्यात आतापर्यंत पहिली जी तीन डिझेल इंजिने आली, त्यातील एक इंजिन नेरळ-माथेरान मिनिट्रेनसाठी लावले जाते. तर एनडीएम ५०१, ५०२, ६०१, ६०२, ५५०, ५५१ ही सहा इंजिने सध्या मिनीट्रेनच्या ताफ्यात आहेत. असे असतानाही मिनीट्रेन अनेकदा रु ळावरून खाली घसरून पर्यटक प्रवाशांचे हाल होत असतात. मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळाचे महत्त्व अधिक प्रखरपणे जगाच्या पातळीवर नेण्यासाठी लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात परळ येथील तंत्रज्ञांनी अहोरात्र मेहनत घेऊन मिनीट्रेनसाठी नवीन अधिक जास्त ताकदीचे इंजिन तयार केले आहे. ४०० एनडीएम १ हे इंजिन नेरळ येथे पोहोचले असून, ते शुक्रवारी नेरळ लोको शेडमध्ये उतरविले आहे. यापूर्वीची मिनीट्रेनची सर्व इंजिने ही ३०० हॉर्स पॉवर क्षमतेची होती. ती सर्व इंजिने जेमतेम सहा प्रवासी डबे वाहून नेत होती. मात्र २४ टन क्षमता असलेल्या जुन्या मिनीट्रेन ताफ्यात आता जास्त ताकद असलेले नवीन इंजिन आल्याने मिनीट्रेन अधिक डबे घेऊन प्रवास करू शकतात. नवीन ४०० एनडीएम १ हे इंजिन ३२ हॉर्स पॉवर क्षमतेचे आहे. नवीन इंजिन प्रत्यक्ष रु ळावर येण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असून, नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या मार्गावर हे इंजिन आधी केवळ इंजिन आणि नंतर डबे लावून चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर रेल्वे बोर्डाच्या लखनौ येथील रेल्वेची रिसर्च टीम चाचणी घेणार आहे. सर्वात शेवटी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी हे अंतिम पाहणी केल्यानंतर नवीन इंजिन प्रत्यक्ष ताफ्यात येणार आहे. नवीन इंजिन नेरळ-माथेरान मार्गावर प्रत्यक्ष रु ळावर आल्यानंतर आणखी तीन इंजिने परळ येथील अभियंते तयार करणार आहेत. रंग बदलला : १९७० ला माथेरान मिनी ट्रेन सुरू झाली. यावेळी दोन इंजिने दार्जिलिंग क्लासची अशी तीन इंजिने सेवेत होती. १९५०च्या दशकात माथेरान मिनीट्रेनच्या ताफ्यात डिझेल इंजिन आली. वाफेवर चालणारी इंजिने माथेरान मिनीट्रेनची सेवा करीत होते. डिझेल इंजिनांच्या रंगात, ढंगात कालांतराने नेहमीच बदल होत गेले, मात्र महाराणीचा डौल मात्र कायम राहिला आहे.