वस्त्रोद्योग व्यवसायात भारताचा नावलौकिक व्हावा- तेंडुलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 11:07 PM2019-01-29T23:07:52+5:302019-01-29T23:08:51+5:30
घारापुरी बेटावर रंगला फॅशन शो
उरण : वस्त्रोद्योग व्यवसाय भरभराटीस येऊन जगात भारताचा नावलौकिक व्हावा, अशी भावना भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त के ली.भारत सरकारच्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने घारापुरी बेटावर सोमवारी सायंकाळी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या, त्यांनी भारतातील वस्त्रोद्योग वाढण्यासाठी उद्योजकांना आवश्यक त्या परवानगी तत्काळ देण्यात येतील, अशी ग्वाही दिली. तसेच देशभरातील नामांकित वस्त्रोद्योग कंपन्यांबरोबर करारही करण्यात आले असून, त्यांना आवश्यक परवानगीपत्रही देण्यात आल्याचे सांगितले.
घारापुरी लेणी परिसरात आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये अनेक फॅशनेबलच्या वस्त्रांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्र माप्रसंगी वस्त्रोद्योग व्यवसायासंदर्भात विविध कंपन्यांसोबत करारही करण्यात आले. घारापुरी बेटावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आदी मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायत घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांच्या हस्ते झाले, या वेळी उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य मंगेश आवटे, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर, सखाराम भोईर यांच्यासह मोठ्या प्रमाणात घारापुरी ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.