कर्जत : कर्जत तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने पीकही चांगले आले आहे. त्यामुळे भातपिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभाग सतर्क आहे. कोणत्या भागात कोणत्या कीटकांचा प्रादुर्भाव होत आहे, याची माहिती क्रॉससॅप हे यंत्र बसवून घेतली जात आहे.
कर्जत तालुक्यात ९१०७ हेक्टर जमिनीवर भातशेती केली आहे. तालुक्यात यंदा ३५०० मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अजूनही पाऊस सुरू असून पाऊस लांबल्यास भातपिकावर परिणाम होऊ शकतो. सध्या भातपीक चांगले तयार झाले असून रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. माळरानावर असलेल्या भातपिकावर खोडकीडा तर काही भागात बगळा रोग दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून अनेकांनी कृषी विभागाशी संपर्क साधून मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले आहे. कृषी विभागाने तत्काळ तालुक्यातील भातपिकांवर कोणत्या प्रकारच्या अळ्यांनी शिरकाव केला आहे, याची माहिती घेतली. कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून वाऱ्याबरोबर येण्याचे प्रमाण ओळखण्यासाठी कृषी विभागाने आॅनलाइन यंत्रणेची मदत घेतली आहे. यासाठी कृषी विभागाने २५ कृषी सहायक आणि ४ कृषी पर्यवेक्षक यांना कर्जत तालुक्याच्या विविध भागात पाठवले आहे. त्यांना सोबत क्र ॉपसॅप हे यंत्र दिले असून ते शेतात बसवल्यास परिसरात कोणत्या कीटकांचा प्रादुर्भाव होत आहे, याची माहिती मिळते. त्यानंतर शेतकºयांनी कोणती कीटकनाशके वापरावी यासाठी जनजागृती मोहीम कृषी विभागाने हाती घेतली आहे.काय आहे क्रॉपसॅप?हे यंत्र शेतात बसवल्यास इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाइन देखरेख ठेवली जाते. त्यात वातावरणात होणारे बदल आणि त्यासोबत आलेले कीटक यांची माहिती मिळते. त्यामुळे शेतकºयांना तत्काळ भातपिकांवर येत असलेल्या रोगांची माहिती मिळते. त्यासाठी २२२५ क्रॉपसॅप कृषी विभागाने दिले आहेत.