माणगावात रानभाज्यांची आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 02:01 AM2019-06-24T02:01:13+5:302019-06-24T02:01:50+5:30

माणगाव तालुक्यात रानभाज्यांची आवक वाढली. स्थानिक आणि पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर या रानभाज्यांना पसंती दिली जात आहे.

The inflow of nomads increased in Mangaon | माणगावात रानभाज्यांची आवक वाढली

माणगावात रानभाज्यांची आवक वाढली

Next

- गिरीश गोरेगावकर
माणगाव : तालुक्यात रानभाज्यांची आवक वाढली. स्थानिक आणि पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर या रानभाज्यांना पसंती दिली जात आहे. मुंबई- गोवा महामार्गालगत आदिवासी महिला मोठ्या प्रमाणावर रानभाज्या विकायला बसलेल्या दिसतात.

या रानभाज्यांमध्ये करटोली, शेवलं, अकुर, भारंग, कुलू ( कुवाळा ), रानटी टेरी, गरगटी, आळू, म्हशेळीपान, कुर्डु, कुड्याची शेंग-फुल, शेवग्याची पानं-फुलं, टाकळा, इत्यादी प्रकार सापडतात. भवरीची पानं, याच्या बेसन लावून वड्या करतात. आता हा भाजीचा प्रकार फक्त ऐकण्यापुरता शिल्लक राहिला असल्याचे खेड्यातील जाणकार सांगतात. स्थानिकांसह प्रवासी पर्यटक रानभाज्या घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

या भाज्या पावसाळ्यात मिळत असल्याने त्यांना चांगली मागणी असते. पूर्वी माणगाव तालुक्यात दारोदार घ्या गों भाजी...असा आवाज देऊन आदिवासी विकत असताना दिसत असत. मात्र आता अलीकडे महामार्गावरच आदिवासी महिला रानभाज्या विक्रीसाठी बसलेल्या आढळतात. पावसाळ्यात हे आदिवासी याच व्यवसायातून चार पैसे कमवितात व आपला चरितार्थ चालवितात.

1या भाज्या शिजविताना एका विशिष्ट पद्धतीतच त्या बनव्यावा लागतात. यात शेवलाची भाजी बनविताना भोंडग्याचा पाला वापरतात. आणखी एका प्रकारचा पाला वापरला जातो, त्याला नान्याचा पाला असे खेड्यात संबोधतात. हा पाला सुकवतात आणि जसा लागेल तसा वापरतात. मुंबईकर गावाकडे आले की हा पाला घेऊन जातात. यातील प्रत्येक भाजीचे अनेक औषधी उपयोग गावाकडे सांगितले जातात. या भाज्यांची उपलब्धता ही केवळ पावसाळ्यातच असते. त्यामुळे इतर वेळी या भाज्यांची पिके घेता येत नाही.
2कुलू कुवाळा हे एक प्रकारचे कोवळे गवतच असते. याची चव कांद्याच्या पातीसारखीच आहे. या भाज्या नुसत्या कांदा, लसुणीवर बनविण्यात येतात. चवीसाठी यात डाळी, बीरड देखील टाकतात आणि फारच थोडे तेल, मीठ वापरावे लागते. अतिशय पौष्टिक, चवदार आणि पचायला हलक्या असतात. भारंग भाजी खाण्यामुळे पोटाचे, पचनसंस्थेचे अनेक विकार बरे होतात असे अनेक जण ठामपणे सांगतात. असे म्हणतात की पावसाळ्यात एकदातरी या भाज्या खाव्यात.

Web Title: The inflow of nomads increased in Mangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड