दूषित पाण्यातून ग्रामस्थांना बाधा
By admin | Published: November 22, 2015 12:26 AM2015-11-22T00:26:48+5:302015-11-22T00:26:48+5:30
महाड तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत हद्दीतील दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलटी, जुलाबाचा त्रास झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वाकी ग्रामपंचायत हद्दीतील नाणेमाची येथील
बिरवाडी : महाड तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत हद्दीतील दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलटी, जुलाबाचा त्रास झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
वाकी ग्रामपंचायत हद्दीतील नाणेमाची येथील दुर्गम भागात लोकवस्ती असलेल्या गावामध्ये दूषित पिण्याच्या पाण्याचे सेवन केल्याने येथील ग्रामस्थांना उलटी, जुलाबाचा त्रास गेल्या ८ ते १० दिवसांपासून होत आहे. बाधित नागरिकांनी महाडमधील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आरोग्यसेवक बी. जी. कदम व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या गावाचा दौरा करून पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीकरिता ताब्यात घेऊन येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांच्या रक्ताचे नमुनेदेखील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यामध्ये कोणत्याही नागरिकाला कुठली बाधा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आलेले
नाही; तरीदेखील आरोग्य
यंत्रणा सतर्क असल्याचे बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार यांनी स्पष्ट केले आहे.
गावातील अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत येथील नागरिकांच्या आरोग्याबाबतची माहिती तत्काळ जाणून घेतली. (वार्ताहर)