हापूसच्या संशोधनासाठी पुढाकार; कोकण कृषी विद्यापीठाचा वेंगुर्लेतील फळ संशोधन केंद्रात कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 04:20 AM2017-09-17T04:20:39+5:302017-09-17T04:20:59+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारातील हापूस आंब्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भारतासह फिलिपिन्स, पाकिस्तान आणि बांगलादेशचे राष्ट्रीय फळ म्हणूनही हापूसने प्रतिष्ठा मिळवली आहे.

Initiatives for the research of Hapus; The program is organized by Konkan Agriculture University's Fruit Research Center at Vengurle | हापूसच्या संशोधनासाठी पुढाकार; कोकण कृषी विद्यापीठाचा वेंगुर्लेतील फळ संशोधन केंद्रात कार्यक्रम

हापूसच्या संशोधनासाठी पुढाकार; कोकण कृषी विद्यापीठाचा वेंगुर्लेतील फळ संशोधन केंद्रात कार्यक्रम

Next

- जयंत धुळप ।

अलिबाग : आंतरराष्ट्रीय बाजारातील हापूस आंब्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भारतासह फिलिपिन्स, पाकिस्तान आणि बांगलादेशचे राष्ट्रीय फळ म्हणूनही हापूसने प्रतिष्ठा मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर आंबा संशोधनास प्रोत्साहन देऊन, उत्पादनात जागतिक सहयोग आणि आंबा बागायतीचे ज्ञान हस्तांतरणाकरिता दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पुढाकारातून विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ८ ते १० मे २०१८ या कालावधीत जागतिक परिषदेचे आयोजन आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तापस भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील २० तज्ज्ञ सदस्यांच्या समितीच्या माध्यमातून या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेचे नियोजन करण्यात येत आहे. आंबा उत्पादन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असणाºया विद्यापीठाच्या सहा माजी कुलगुरूंसह अमेरिका, इस्रायल, थायलंड, आॅस्ट्रेलिया, यूकेमधील नामांकित मान्यवर शास्त्रज्ञांचा समावेश या समिती मध्ये आहे.
आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेतील अनेक उष्णदेशीय देशांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. भारतात आंबा लागवडीखालील क्षेत्र दरवर्षी वाढते आहे. देशातील अनेक पिकांच्या तुलनेत, आंबा एक किफायतशीर संख्येत येणारे पीक आहे.
कोकणातील आंबा बागायतीमधील सुधारणा आणि संशोधनाच्या प्रयत्नांमुळे आता हवामानातील बदलांचे दुष्परिणाम कमी करून उत्पादनवाढीस मदत केली आहे. आंबा उत्पादक देशांमध्ये हवामानातील बदलांमधील अनियंत्रित परिस्थितींचा सामना होत आहे आणि त्याचा प्रभाव विशेष करून फुलांच्या (मोहराच्या) शारीरिक अवकृपेत दिसून येतो. कीड आणि रोगाच्या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादक आणि संशोधकांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत. या मुद्द्यांचा विचार ही परिषद आयोजित करण्यामागे आहे.
पारंपरिक शेती पद्धतींच्या व्यतिरिक्त, छत व्यवस्थापन आणि उच्च घनतेचे वृक्षारोपण वाढीचे फायदे, आंबा उत्पादक शेतकºयांचे एकत्रीकरण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण या दृष्टीने मदत करण्याच्या उद्देशाने संरक्षित आंबा शेती, आंबा बाग सुयोग्य व्यवस्थापन आदींना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजना या परिषदेतून पुढे येणार आहेत. किनारपट्टीच्या भागात डोंगराळ भागांत आंबा बागेत ‘सीए’ पद्धतींचा वापर करून उत्पादनाचा खर्चही कमी करता येतो.
शेतकºयांच्या आर्थिक स्तरवृद्धीस प्राधान्य देण्याकरिता फळबागांच्या संगोपनासाठी आणि फळे साठवण्यासाठी यांत्रिक यंत्रे, काढणी पश्चात आवश्यक प्रक्रिया, नॅनो-तंत्रज्ञानासह प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग, जागतिक बाजारपेठ पोहोचण्याकरिता आवश्यक सुयोग्य श्रृंखला यासंदर्भातील मार्गदर्शन
उपलब्ध करून देऊन भारत सरकारच्या ‘दुप्पट शेतकरी उत्पन्न’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात आंबा उत्पादन आणि व्यापारवाढीचा वेग वाढविणारे ज्ञानयंत्र म्हणजे ही परिषद ठरेल, असा विश्वास विद्यापीठाचा आहे.

- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाकरिता, शेतकरी, उद्योग आणि संशोधन यामध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेस अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी’ या संस्थेचा सहयोग घेतला असून, परिषदेचे नऊ उद्देश निश्चित करण्यात आले आहेत.

या नऊ उद्देशांमध्ये
-जागतिक आंबा परिस्थिती
-आंबा अनुवंशिकता आणि प्रजनन (पारंपरिक आणि अपारंपरिक मार्ग)
-हवामानातील बदल
-टिकाऊ उत्पादनासाठी कृषी-तंत्र (प्रसार : एकाग्र पोषण व सिंचन व्यवस्थापन; सेंद्रिय उत्पादन; संरक्षण शेती)
-आंबा फार्म यांत्रीकीकरण (साधने व अवजारे; विनाविध्वंसक तंत्रज्ञान)
-वनस्पती संरक्षण (एकात्मिक कीड, रोग व तण व्यवस्थापन)
-उत्पादन पश्चात पीक व्यवस्थापन (हाताळणी; मूल्यवर्धन; पॅकेजिंग, कचरा आणि बाय-उत्पादने, नॅनो-टेक्नोलॉजी)
-तंत्रज्ञान आणि उत्पादन अर्थशास्त्र हस्तांतरण (यशकथा; केस स्टडी, दुप्पट शेतकरी उत्पन्न) आणि निर्यात आणि व्यापारीकरण यांचा समावेश आहे.

- जागतिक आंबा उत्पादनात भारताचे ४० टक्के पेक्षा अधिक योगदान होते. देशातील अनेक पिकांच्या तुलनेत, आंबा एक किफायतशीर संख्येत येणारे पीक आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून आंबा उत्पादकता वृद्धीकरिता भारतात मोठी संधी आहे.

Web Title: Initiatives for the research of Hapus; The program is organized by Konkan Agriculture University's Fruit Research Center at Vengurle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.