जिल्हा रुग्णालयामध्ये इंजेक्शनचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 01:05 AM2020-02-17T01:05:32+5:302020-02-17T01:05:42+5:30

रुग्णांची गैरसोय : बाहेरून औषधे आणल्याने खिशाला कात्री

Injection breakdown in district hospital | जिल्हा रुग्णालयामध्ये इंजेक्शनचा तुटवडा

जिल्हा रुग्णालयामध्ये इंजेक्शनचा तुटवडा

Next

निखिल म्हात्रे 

अलिबाग : जिल्हा सरकारी रु ग्णालय समस्यांच्या गर्तेत असल्याने नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, सध्या रुग्णालयात अँटिबायोटिक इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रु ग्णांना पैसे भरून बाहेरून इंजेक्शन आणावी लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा उपचारासाठी खाली होत आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आता सर्वसामान्य रुग्णांचा विचार करून त्यांना उपचार उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

जिल्हा सामान्य रु ग्णालयाच्या औषध भंडार विभागात सध्या रुग्णांना उपचारादरम्यान लागणाऱ्या अँटिबायोटिक इंजेक्शनचा तुटवडा आहे. साप, विंचू, कुत्रा यांचा दंश तसेच अन्य विषारी रोगावर उपचारासाठी लागणारी इंजेक्शन उपलब्ध आहेत. मात्र, गंभीर आजार बरा करणारी आवश्यक अँटिबायोटिक इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रु ग्णाला बाहेरून ही इंजेक्शन आणण्याचा सल्ला संबंधित डॉक्टरांकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांच्या खिशाला नाहक भुर्दंड पडत असल्याने नाराजीचा सूर आहे.
राज्य सकारने सरकारी रु ग्णालयात सर्व औषधे वितरित करण्याची जबाबदारी ही एका नामांकित संस्थेला दिलेली आहे. मात्र, राज्यभर औषध वितरित करण्यात त्यांचे हात तोकडे पडत असल्याने अनेक वेळा औषधांचा तुडवडा जाणवू लागला आहे.
पूर्वी आरोग्य विभाग तसेच जिल्हा रु ग्णालयाला औषध खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. मात्र, २०१७ नंतर औषध वितरित करण्यासाठी संस्थेला अधिकार दिल्याने औषधांचा तुटवडा रु ग्णालयात जाणवू लागला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सरकारने पुन्हा औषध खरेदीसाठी रु ग्णालयालाच अधिकार देणे गरजेचे असल्याची मागणी आहे.

रुग्णांसह डॉक्टरांनाही सहन करावा लागतो त्रास
च्अँटिबायोटिक इंजेक्शन साठा रु ग्णालयात नसल्याने रुग्णाच्या उपचारासाठी डॉक्टरांना बाहेरून इंजेक्शन मागवावी लागत आहेत. त्यामुळे रुग्णासह डॉक्टरांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
च्जिल्हा सामान्य
रु ग्णालयातील इंजेक्शन साठ्याच्या कमतरतेबाबत प्रशासनाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा इंजेक्शन कमतरतेमुळे एखाद्या रु ग्णाचा जीव जाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

जिल्हा सामान्य रु ग्णालयात जीव वाचवणारी इंजेक्शन उपलब्ध आहेत. अँटिबायोटिक इंजेक्शन कमतरता असली तरी रु ग्णांना बाहेरून इंजेक्शन जिल्हा
रु ग्णालयामार्फत दिले जात आहे. त्याचा रु ग्णावर ताण दिला जात नाही. लवकरच अँटिबायोटिक इंजेक्शन साठा उपलब्ध केला जाईल.
- डॉ. प्रमोद गवई, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक
 

Web Title: Injection breakdown in district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड