भरतीमध्ये आदिवासी उमेदवारावर अन्याय
By admin | Published: December 27, 2016 02:38 AM2016-12-27T02:38:24+5:302016-12-27T02:38:24+5:30
सुधागड तालुक्यातील अनुदानित पडसरे व चिवे येथील आश्रमशाळेच्या भरती प्रक्रि येत बोगस गुणांकन करून आदिवासी समाजाच्या पात्र उमेदवाराला डावलून भरती केल्याचा आरोप
पाली : सुधागड तालुक्यातील अनुदानित पडसरे व चिवे येथील आश्रमशाळेच्या भरती प्रक्रि येत बोगस गुणांकन करून आदिवासी समाजाच्या पात्र उमेदवाराला डावलून भरती केल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थी कृती समितीचे राज्य अध्यक्ष सुनील टोटवळ यांनी केला आहे.आदिवासी विभाग अप्पर आयुक्त ठाणे व आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी पेण यांना याबाबत निवेदन दिले आहे.
कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली सुधागड या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या पडसरे व चिवे आश्रमशाळेतील रिक्त असलेल्या वर्ग ४ पदाकरिता २० सप्टेंबर २०१६ रोजी मुलाखती व लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या आदिवासी समाजातील मारुती लहू डोके याच्यावर अन्याय झाला असल्याचे टोटवळ यांचे म्हणणे आहे. ही भरती प्रक्रि या रद्द करून ती नव्याने घेण्यात यावी तसेच या भरती प्रक्रि येची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी के ली आहे.
जोपर्यंत डोके यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कायदेशीर मार्गाने हा लढा आम्ही असाच सुरु ठेवणार व वेळ पडल्यास डोके याच्याबरोबर आम्ही उपोषणाचे हत्यार देखील उपसू आसा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
सुधागड तालुक्यातील अनुदानित पडसरे व चिवे येथील आश्रमशाळेतील भरती प्रक्रिया पूर्णपणे नियमात व पारदर्शक झाली आहे. या भरतीत अनुसूचित जमाती संवर्गासाठी जागा नव्हत्या. खुल्या प्रवर्गासाठी जागा होत्या. या भरती प्रक्रि येसाठी आदिवासी प्रकल्प विभाग व समाज कल्याण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या भरती प्रक्रि येबाबत कोणत्याही चौकशीला आम्ही सामोरे जाऊ.
- रवींद्र लिमये,
संचालक, अनुदानित आश्रमशाळा पडसरे व चिवे