मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पेण-पनवेल रेल्वेमार्गाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:09 PM2018-10-19T23:09:01+5:302018-10-19T23:09:12+5:30

शटल सेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक : पेणमध्ये लांबपल्ल्यांच्या गाड्यांना हवा थांबा

Inspection of Pen-Panvel railway route by Central Railway authorities | मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पेण-पनवेल रेल्वेमार्गाची पाहणी

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पेण-पनवेल रेल्वेमार्गाची पाहणी

Next

अलिबाग : पेण-पनवेल रेल्वेमार्गावर शटल सेवा सुरू करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी मध्य रेल्वेच्या केंद्रीय उच्चस्तरीय तांत्रिक अधिकारी पथकाने रेल्वेमार्गाची पाहणी केली.
शटल सेवा सुरू करण्याबरोबरच पेण स्थानकात लांबपल्ल्याच्या सर्व गाड्यांना विनंती थांबा मिळावा, या मागणीकरिता मी पेणकर, निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशन आणि अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्य रेल्वेच्या केंद्रीय उच्चस्तर तांत्रिक अधिकारी पथकाने ही पाहणी केली.
मध्य रेल्वे प्रशासन पेण-पनवेल रेल्वेमार्गावर शटल सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक असून, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती या वेळी निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशनचे अध्यक्ष योगेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

डिझेलमुक्त भारत उपक्रमांतर्गत ‘पेण-पनवेल’ देशातील पहिला रेल्वेमार्ग
पेण-पनवेल-पेण रेल्वे शटल सेवा व लांबपल्ल्याच्या रेल्वेला विनंती थांबा मिळावा, यासाठी लेखी तोंडी मागणी व आंदोलने गेले अनेक वर्षे करीत आहोत.
२ आक्टोबर २०१८ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने पेण ते सीएसएमटी (१०३ किलोमीटर) या मार्गावर पेण - पनवेल- पेण डिझेलमुक्त भारत या उपक्रमातून देशातील इलेक्ट्रिक रेल्वे मार्ग होण्याचा मान रेल्वे प्रशासनाने दिल्याने, आंदोलनचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.


पथकाकडून विविध स्थानकांची पाहणी
आॅक्टोबर २०१८ रोजी मध्ये रेल्वेने दिलेल्या आश्वासनानुसार रेल प्रशासनाला काम करण्यासाठी वेळ हवा होता. सकाळी ९.३० वाजता पनवेल, १० वाजता सोमटणे रेल्वेस्थानक, १०.२० वाजता रसायनी, १०.५० वाजता आपटा रेल्वेस्थानक-बोगदा, दुपारी १ वाजता जिते व हमरापूर रेल्वेस्थानक, दुपारी १.३० वाजता पेण रेल्वेस्थानक विद्युतीकरण व इतर तांत्रिक बाबी, दुपारी ३ ते ५ पेण ते पनवेल रेल्वे विद्युतीकरण काम तांत्रिक पाहणी केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. डहाणू-पेण-डहाणू, वसई-पेण-वसई, पेण-सीएसटी-पेण, ठाणे-पेण-ठाणे, कल्याण-पेण-कल्याण, दिवा-पेण-दिवा ही प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता असून पेण-अलिबाग या रेल्वेमार्गास चालना मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Inspection of Pen-Panvel railway route by Central Railway authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे