महाडमध्ये नुकसानीपेक्षा भरपाई रक्कम अपुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 02:10 AM2019-11-28T02:10:04+5:302019-11-28T02:10:49+5:30

महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे.

Insufficient amount of compensation in Mahad | महाडमध्ये नुकसानीपेक्षा भरपाई रक्कम अपुरी

महाडमध्ये नुकसानीपेक्षा भरपाई रक्कम अपुरी

Next

- सिकंदर अनवारे

दासगाव : महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे. याची रक्कम महाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४५ लाख दहा हजार रुपये आली असून, ४९ गावांमधील २००० शेतकºयांना याचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.

प्रत्यक्षात १ कोटी ५८ लाख रुपये भरपाई रक्कम येथे अपेक्षीत होते मात्र, नुकसानीपेक्षा भरपाई कमी असल्याने शेतकरी वर्ग या नाराज आहे. शासनाने शेतकºयांवर अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कमी रक्कम जमा झाल्याने किती शेतकºयांना हा मोबदला देण्यात येणार आहे आणि शिल्लक शेतकºयांचा पैसा कधी येईल याकडे सर्व शेतक-यांचे लक्ष लागले आहे.

या वर्षी लांबलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. संपूर्ण राज्यांमध्ये या वर्षीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडून शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शेतकºयांना प्रतिहेक्टर आठ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. अवेळी पाऊस आणि परतीच्या पावसाने महाड तालुक्यामध्ये दोन हजार २३ शेतकरी बाधित झाले.

या नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रथम टप्पा म्हणून ४५ लाख दहा हजार ८६९ नुकसानभरपाई दाखल झाली असल्याची माहिती महाडचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली. तालुक्यामध्ये सुमारे सात हजार शेतकºयांचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती महाड तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी दिली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागांमध्येही भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यात येत असून महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महाडमधील २०३ शेतक-यांचा पीक विमा

महाड तालुका कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या तर्फे तालुक्यातील भातशेतीची पाहणी करण्यात आल्यानंतर पावसामुळे झालेल्या भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. दोन हजार ४०० शेतकºयांच्या शेताचे पंचनामे जरी करण्यात आले असले, तरी सुमारे सात हजार शेतकºयांच्या भाताचे नुकसान झाले आहे.
 
महाड तालुक्याचा बहुतांशी भाग हा डोंगराळ प्रदेशाने व्यापलेला असून त्यातील बरीचशी शेती डोंगरउतारावर आहे. येथील भौगोलिक स्थितीमुळे शेतीचे क्षेत्र कमी आहे. यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकºयांना गुंठा ८० रुपयेच मिळणार आहे.
|
तालुक्यातील २०३ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे. हा विमा अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून उतरविण्यात आला असून, विमा कंपनीकडूनहीत्यांना भरपाई मिळेल. मात्र, विमा प्रकरण मंजूर होईपर्यंत शासकीय मदत शेतकºयांना मिळणार आहे.

पुढील टप्प्यातील वाटप कधी; प्रशासन अनभिज्ञ
सध्या आलेली रक्कम ही अपुरी आहे आणि नुकसानग्रस्त शेतकरी संख्या अधिक आहे.
आलेली रक्कम कशा प्रकारे वाटप केली जाणार आहे, याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे.
ही अपुरी रक्कम वाटपानंतर पुढील टप्पा कधी येणार याबाबत मात्र महसूल विभागाकडून काही सांगण्यात आले नाही.

Web Title: Insufficient amount of compensation in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.