आंतरराष्ट्रीय कोस्टल स्वच्छता दिवस : रायगडमधील समुद्रकिनारे झाले स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 04:23 AM2017-09-17T04:23:03+5:302017-09-17T04:23:07+5:30
आंतरराष्ट्रीय कोस्टल स्वच्छता दिवस असल्याने रायगड जिल्ह्यातील समुद्रकिना-यावर आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग, काशीद व मुरुड हे समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आले.
मुरु ड जंजिरा : आंतरराष्ट्रीय कोस्टल स्वच्छता दिवस असल्याने रायगड जिल्ह्यातील समुद्रकिना-यावर आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग, काशीद व मुरुड हे समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आले.
तीनही समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी एन.सी.सी. युनिट जेएसएम महाविद्यालय, कन्याशाळा अलिबाग, वसंतराव नाईक महाविद्यालय, सर एस ए हायस्कूल मुरुड, ज्येष्ठ नागरिक संघटना अलिबाग, मैत्री फाउंडेशन अलिबाग, नचिकेताज हायस्कूल विहूर, आरोग्य विभाग कर्मचारी, मुरुड महसूल कर्मचारी आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सागरीकिनारे स्वच्छ व सुंदर करण्यात आले. काशीद समुद्रकिनाºयावरून पाच टन कचरा गोळा करण्यात आला. तर मुरुड समुद्रकिनाºयावरून दोन टन कचरा गोळा करण्यात आला आहे. गोळा करण्यात आलेल्या कचºयाची विल्हेवाट नगरपरिषद व ग्रामपंचायत प्रशासनाकडून लावण्यात येणार आहे. हजारो विद्यार्थी, नागरिक या अभियानात सहभागी झाल्याने समुद्रकिनारे स्वच्छ होऊन पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. निर्मल सागर तट स्वच्छता मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे.