अलिबाग : रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अलिबाग येथील पंचतारांकित हॉटेल रॅडीसन येथे छापा टाकून, तीन परदेशी महिलांना पकडून आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींसह वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच परदेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून चालणाºया या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा कारवाई केली.पोलिसांनी या प्रकरणी संदीपकुमार रवींद्र प्रसाद सिंग (३०, रा. धारावी), नीतेश राजनंद सिंग (४०, रा. विरार), नरेश सुंदरलाल खाटील (४२, रा. वांद्रे), डॅफनी क्लेरा लिंकन पॅपी (६०, रा. भार्इंदर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.इंटरनेटवर अलिबाग शहरासह रायगड जिल्ह्यात भारतीय, तसेच परदेशी कॉलगर्ल्स २४ तास पुरविल्या जातात, अशा विविध जाहिराती सोशल मीडिया आणि इंटरनेटवर प्रसारित केल्या जात होत्या. या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेऊन हाय प्रोफाइल ग्राहकांसाठी कोणत्या ठिकाणी असा वेश्या व्यवसाय चालतो, याची माहिती घेतली. त्यानंतर, जाहिरातीमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन केला. मग समोरून आयसीआयसीआय बँकेच्या खात्यामध्ये ठरावीक रक्कम भरणा करण्यास सांगितले. रक्कम भरल्यानंतर २४ जुलै रोजी अलिबाग येथील पंचतारांकित हॉटेल रॅडीसनमध्ये तीन परदेशी मुली पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या हॉटेलमध्ये रूमचे बुकिंग वगैरे सर्व व्यवस्थित झाले होते. त्यानंतर, पोलिसांनी बोगस गिºहाइकांमार्फत संबंधित रूममध्ये ठरलेली रक्कम दिल्यावर, त्या संबंधित व्यक्तीने रक्कम मिळाली आहे, असे मोबाइलवर समोरच्याला कळविले. मग तीनही परदेशी कॉलगर्ल्सनी रूममध्ये प्रवेश केला. पोलिसांनी पंचासमक्ष रूममध्ये छापा टाकला. कॉलगर्ल्सना घेऊन येणारा, त्यांना गाडीतून आणणाºयांना, तसेच कॉलगर्ल्स पुरविणाºया महिलेची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कॉलगर्ल्स पुरविणाºया डॅफनी क्लेरा लिंकन पॅपी या महिलेला वांद्रे येथील राहत्या घरातून अटक पोलिसांनी केली. त्या वेळी तेथे अन्य दोन परदेशी कॉलगर्ल्स मिळून आल्या. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सुधारगृहात रवानगीपोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच महिला या कोलंबिया, दक्षिण अमेरिका या देशातील रहिवासी आहेत. टुरिस्ट व्हिसाद्वारे त्या भारतामध्ये आल्या आहेत. या पाच मुलींची रवानगी कर्जतच्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे.डॅफनी क्लेरा लिंकन पॅपी, संदीपकुमार रवींद्र प्रसाद सिंग, नीतेश राजनंद सिंग, नरेश सुंदरलाल खाटील यांनी सदर कॉलगर्ल्सना बंगळुरू, दिल्ली, पुणे, चंदीगड, हैदराबाद, अलिबाग या ठिकाणी पाठवून, त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याची कबुली दिली आहे.
आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:55 AM