इंटरनेटचे युग पाल्याच्या दृष्टीने धोकादायक -आयुक्त संजयकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:58 AM2019-12-30T00:58:54+5:302019-12-30T01:13:44+5:30

उरण : पाल्यांना वाचनाची सवय झाली पाहिजे. मात्र प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या हातात मोबाइल देत आहेत. सध्याचे इंटरनेट युग ...

Internet age dangerous - Commissioner Sanjay Kumar | इंटरनेटचे युग पाल्याच्या दृष्टीने धोकादायक -आयुक्त संजयकुमार

इंटरनेटचे युग पाल्याच्या दृष्टीने धोकादायक -आयुक्त संजयकुमार

Next

उरण : पाल्यांना वाचनाची सवय झाली पाहिजे. मात्र प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या हातात मोबाइल देत आहेत. सध्याचे इंटरनेट युग हे पाल्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी व्यक्त केले आहे.

पी.पी.खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक शाळा, काळूशेठ धाकू खारपाटील कनिष्ठ महाविद्यालय व ठकूबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यम शाळा चिरनेर या विद्यासंकुलाचा संयुक्तपणे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी पार पाडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शनचे उद्घाटन करण्यात आले. तर पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या हस्ते लिफ्टचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२चे अशोक दुधे हेसुद्धा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उरणचे आमदार महेश बालदी यांनी पी पी खारपाटील यांनी सुरू केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला. यावेळी आमदार महेश बालदी यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.

विद्यार्थ्यांचे नुकसान
मोबाइल आणि सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांचे कशा प्रकारे नुकसान होत आहे, हे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून यावेळी सांगितले. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Internet age dangerous - Commissioner Sanjay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.