जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कारनाम्यांची चौकशी करा; आस्वाद पाटील यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:08 AM2021-03-25T00:08:21+5:302021-03-25T00:08:29+5:30
ॲड. आस्वाद पाटील यांनी जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुधाकर माेरे यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. काेराेना कालावधीत आव्वाच्यासव्वा किमतीमध्ये साधन-सामग्रीची खरेदी आली अंगाशी
निखिल म्हात्रे
अलिबाग : आराेग्य विभागाने काेराेनाच्या कालावधीत आव्वाच्यासव्वा किंमतीमध्ये साधन-सामग्री खरेदी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चाैकशी करावी अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ॲड. आस्वाद पाटील यांनी केली.
रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटीस सभागृहात सर्वसाधरण सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सभेमध्ये अर्थ व बांधकाम सभापती निलीमा पाटील यांनी सन २०२१ -२२ चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सुरु असताना विविध सदस्यांनी आराेग्यांच्या प्रश्नांचा सभेमध्ये भडीमार सुरु केला. त्यावेळी आराेग्य विभागाचे कामकाज किती सुमार आणि चिड आणणारे आहे. हेच सर्व पक्षीय सदस्यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले. त्यावेळी
ॲड. आस्वाद पाटील यांनी जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुधाकर माेरे यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. कोरोना कालावधीत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. माेरे यांनी साडे सहा हजार रुपये किमतीची टेम्प्रेचर गन तब्बल १५ हजार रुपयांना खरेदी केली, तसचे आॅक्सीमीटर बाजारात ५०० रुपयांना मिळते ते डाॅ. माेरे यांनी अडिच हजार रुपयांना खरेदी केले आहे. यासह अन्य साधनांच्याबाबतीमध्ये तसेच झाले आहे. त्यामुळे डाॅ.माेरे यांच्या प्रकरणाची चाैकशी करावी अशी मागणी ॲड. पाटील यांनी केली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या पथ दिव्यांचा वीजपुरवठा वीजमंडळाने खंडित केला असल्याने काळोखाचे साम्रज्य पसरले आहे.
याबाबत आजच्या सभेत सदस्यांनी जोरदार चर्चा घडवून आणली. काही व्यक्ती पथदिप वीजपुरवठा खंडित होण्याला जिल्हा परिषद सदस्य जबाबदार असल्याचे सांगून वृत्तपत्र आणि समाज माध्यमांवर जिल्हा परिषदेची बदनामी करीत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. पथदिव्यांच्या वीजदेयकांबाबत जिल्हापरिषदेचा संबंध नसताना काहीजण बदनामी करीत आहेत त्यामुळे अशी बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी काही सदस्यांनी केली. महाड तालुक्यातील शिरगाव ग्रमपंचायतीच्या सरपंचांनी अशाच प्रकारे जिल्हा परिषद सदस्यांबाबत वृत्त पसरवले असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी केली. तसेच पथदिपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत काय उपाययोजना करण्यात येत आहेत याबाबतही विचारणा केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. किरण पाटील यांनी सविस्तर खुलासा केला.
आरोग्य केद्रांची दुरवस्था
जिल्ह्यातील प्रथमिक आरोग्य केद्रांच्या दुरावस्थेबद्दल महाडच्या सभापतींसह अन्य सदस्यांनी समस्या मांडल्या. आरोग्य अधिकारी आरोग्य केंद्रांतील सुविधांबाबत चालढकलपणा करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. इतर विषयांवरही या सभेत चर्चा झाली.