अंतर्गत रस्त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:32 AM2017-08-16T01:32:20+5:302017-08-16T01:32:24+5:30

मुरुड नगरपरिषद हद्दीतील अंतर्गत रस्ते हे नवीन स्वरूपात बनवत असताना, २ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.

The investigation of corruption of internal road | अंतर्गत रस्त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार

अंतर्गत रस्त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार

Next

नांदगाव/ मुरुड : मुरुड नगरपरिषद हद्दीतील अंतर्गत रस्ते हे नवीन स्वरूपात बनवत असताना, २ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, हे रस्ते तयार करताना निकृष्ट दर्जाचे बनवण्यात आले होते. याबाबत आपली योग्य ती कैफियत राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते यांनी आमदार सुनील तटकरे यांच्याकडे योग्य ती कागदपत्रे सुपूर्द केली होती.आमदार सुनील तटकरे यांनी चालू अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून शासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे आदेश देऊन, जे कोणी अधिकारी व नगरसेवक दोषी आढळतील यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानंतर या प्रकरणात गोवलेल्या सर्वांच्या अडचणीत भर पडली असून, चौकशी समितीसमोर त्यांना लवकरच हजर व्हावे लागणार आहे. आ. सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता, महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम ५५ अ व ५५ ब प्रमाणे मंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी तीन महिन्यांत पूर्ण होणार असून, या चौकशी समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असणार आहेत. या चौकशीत नगरपरिषदेत कर्मचारी तसेच नगरसेवक दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार असून, रीतसर कार्यवाही होणार आहे. आमदार म्हणून मी नगरपरिषदेसंदर्भात जे जे प्रश्न उपस्थित केले आहेत, यामध्ये या चौकशी समितीसमोर सर्व प्रश्नांची चौकशी होणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
>मुरु ड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर यांनी मुरु ड शहराच्या अंतर्गत रस्त्यात शंभर टक्के भ्रष्टाचार झाला असून, याबाबत आमदार तटकरे यांना आम्ही निवेदन दिलेले होते, त्याप्रमाणे तटकरे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून दिला. या प्रकरणात गुंतविलेले अधिकारी वर्ग, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यावर चौकशी संपन्न झाल्यावर उचित कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: The investigation of corruption of internal road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.