भ्रमाचा भोपळा फुटणार, आता रडायचं नाही लढायचं; आमदार राजन साळवींचा निशाणा
By राजेश भोस्तेकर | Published: December 14, 2022 11:34 AM2022-12-14T11:34:24+5:302022-12-14T11:38:04+5:30
अलिबाग लाच लुचपत कार्यालयात आमदार हजर
अलिबाग : माझ्या सारख्या सर्व सामान्य शिवसैनिकाला नोटीस पाठवून मोठे घबाड असल्याचे सरकारला वाटत आहे. मात्र त्याचा भ्रमनिरास होइल. सरकारच्या माध्यमातून मला मालमत्ते बाबत नोटीस देण्यात आलेली आहे. नोटीस आलेली आहे, त्याला सामोरे जाणार आहे. यासाठी आज अलिबाग येथे लाच लुचपत कार्यालयात हजर राहणार आहे. त्याच्या प्रश्नाची उत्तरे देईल पण भ्रमाचा भोपळा फुटेल असे माझे मत आहे. अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.
शिवसैनिक म्हणुन मी माझ्या भागात काम करीत आहे. अशा कितीही नोटिसा आल्या तरी त्याला घाबरत नाही. शिवसेना प्रमुखांनी शिकवले आहे रडायचं नाही लढायचं. मी मोहिमेवर चाललो आहे. शिवसैनिकाचे, कुटुंबाचे, मतदारांचे आशीर्वाद आहे त्यामुळे मी डगमगत नाही आहे. असे आमदार साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अलिबाग येथे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून चौकशी, शिवसैनिकांची घोषणाबाजी #RajanSalvipic.twitter.com/kt5yZx5D6Z
— Lokmat (@lokmat) December 14, 2022
अलिबाग रायगड लाच लुचपत कार्यालयात आमदार राजन साळवी हजर राहून चौकशीला सामोरे जात आहेत. कार्यालयात आले असता शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून परिसर दुमदुमला होता. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.