रायगड - एखादा शासकीय कार्यक्रम असला की शिष्टाचार नियमानुसार स्थानिक आमदार, खासदार यांना निमंत्रण देणे आवश्यक असते. रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारत सोहळ्याला विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांचा विसर पडून निमंत्रण पत्रिका न देता व्हॉट्सअॅपवर निमंत्रण दिले. खासदारांना व्हॉट्सअॅपवर निमंत्रण पाठविल्याने कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे संतापले व त्यांनी कृषी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
किल्ला येथे कृषी विज्ञान केंद्र आहे. या केंद्राची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन व आंतरराष्ट्रीय भरडधान्य २०२३ निमित्त शेतकरी मेळावा कृषी विभागाकडून आयोजित केला होता. या सोहळ्याला कृषीमंत्री अब्दुल सत्तार, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत खा. सुनिल तटकरे व आदित तटकरे उपस्थित होते. शाकीय कार्यक्रम असल्याने जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनाही शिष्टाचार निमंत्रण देणे आवश्यक होते.
कॅमेरा सुरू असल्याचे पालकमंत्री म्हणाले....
कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे अधिकाऱ्याची कानउघाडणी करीत असताना वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधीही कॅमेरे लावून उपस्थित होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी कृषिमंत्री यांना कॅमेरे सुरू असल्याचे म्हटले. त्यावेळी कृषिमंत्री हेदेखील 'जे आहे ते आहे' असे म्हणाले.