अलिबाग : ठाणे येथील खारभूमी विकास विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. आव्हाड यांनी गुरुवारी अलिबाग तालुक्यातील मेडेखार व देहेनकोनी येथे पथकासह संरक्षक बंधाऱ्यांच्या अवस्थेची पाहणी केली. खारभूमी योजनांच्या अंतर्गत समुद्र संरक्षक बंधाºयांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अलिबाग उपविभागीय अधिकाºयांना दिले आहेत. परिणामी, १९८२ सालापासून अनुप्तादक झालेल्या देहेनकोनी व मेढेखार या दोन खारभूमी योजनांतर्गतच्या भातशेतीला पुन्हा नवसंजिवनी प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती श्रमिकमुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.अलिबाग तालुक्यातील सांबरी ते रेवस या खाडीकिनारा पट्ट्यातील एकूण ३७ पैकी ३५ योजनांचे दुरुस्ती अंदाजपत्रक व त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे काम सध्या सुरू आहे. मात्र, त्याच पट्ट्यातील १६९ हेक्टर क्षेत्राशी निगडित देहेनकोनी व १३६ हेक्टर क्षेत्राशी निगडित मेढेखार या खारभूमी योजनांचे अंदाजपत्रक तयारच करण्यात आले नसल्याचे श्रमिक मुक्ती दलाने एका निवेदनाद्वारे ठाणे येथील खारभूमी विकास विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. आव्हाड यांच्या लक्षात आणून दिले होते. त्याची अत्ंयत गाभीर्याने दखल घेऊन त्याची दखल घेऊन आव्हाड यांनी गुरुवारी ही पाहणी स्वत: येऊन केली.अलिबाग तालुक्यातील ५६०० हेक्टर क्षेत्रास बंद पाइपलाइनद्वारे सिंचनाचे पाणी या खारयोजनांशी संबंधित क्षेत्र हे अंबाखोरे प्रकल्पाचे लाभक्षेत्र असल्याने आणि अलिबाग तालुक्यातील ५६०० हेक्टर लाभक्षेत्रास बंद पाइपलाइनद्वारे सिंचनाचे पाणी देण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला असल्याने देहेनकोनी व मेढेखार या क्षेत्रातील शेतकºयांना त्याचा लाभ मिळण्यासाठी आताहोणारे अंदाजपत्रक व प्रशासकीय मंजुरी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे भगत यांनी अखेरीस सांगितले.
अलिबागमधील ५६०० हेक्टर क्षेत्रास मिळणार सिंचनाचे पाणी; देहेनकोनी, मेढेखार खारभूमी योजनांना संजिवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:15 AM