इर्शाळवाडी दुर्घटना: आतापर्यंत काय काय घडलं, जिल्हा प्रशासनाने दिली सविस्तर माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 03:56 PM2023-07-22T15:56:44+5:302023-07-22T15:58:07+5:30

Raigad Irshalwadi Landslide Incident: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या खाली असलेल्या इर्शालवाडी येथे बुधवार १९ जुलै रोजी डोंगराचा काही भाग कोसळून  मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे

Irshalwadi accident: What happened so far, district administration gave detailed information | इर्शाळवाडी दुर्घटना: आतापर्यंत काय काय घडलं, जिल्हा प्रशासनाने दिली सविस्तर माहिती 

इर्शाळवाडी दुर्घटना: आतापर्यंत काय काय घडलं, जिल्हा प्रशासनाने दिली सविस्तर माहिती 

googlenewsNext

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या खाली असलेल्या इर्शालवाडी येथे बुधवार १९ जुलै रोजी डोंगराचा काही भाग कोसळून  मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८१ जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेनंत घटनास्थळावर आतापर्यंत काय काय घडलं, याचा आज दुपारी १२.३० वाजेपर्यंतचा अहवाल रायगड जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे. त्यात दिलेली माहिती पुढील प्रमाणे.

दिनांक १९ जुलै २०२३ रोजी रात्री मौजे चौक मानिवली ता. खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील इरशालवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने आदिवासीवाडीतील घरे मातीच्या ढिगा-याखाली गेल्याची प्राथमिक माहिती रात्री ११.३५ वाजताच्या सुमारास जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली. प्रशासकीय यंत्रणेमार्फत सर्व बचाव पथकांना तात्काळ पाचारण करण्यात आले. परंतु दुर्गम भाग व मुसळधार पाऊस यामुळे बचावपथक घटनास्थळी रात्री १२.४० वा. पोहचले व बचाव कार्यास सुरवात केली. सलग चौथ्या दिवसी आज सकाळी ७.०० वाजल्यापासून शोध व बचाव कार्याची सुरवात झाली.

इरसालवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सव्हेक्षण (GSI) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. खालापूर तालुक्यामध्ये दि. १७/०७/२०२३ ते दि.१९/०७/२०२३ या ३ दिवसामध्ये एकूण ४९९ मिमि पावसाची नोंद झालेली आहे.

त्यानंतर चौक महसूली मंडळातील पावसाची नोंद दि. २०/०७/२०२३-२२४.८ मि.मि. दि. २१/०७/२०२३ - सदर ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात स्थित असून, सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून, मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे जागते. सद्यस्थितीत घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी तसेच अद्यापही काही प्रमाणात भूस्खलन होत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. तथापि NDRF पथकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बचावकार्य अविरहीतपणे सुरु आहे. 

- आज रोजी बचाव पथकात NDRF पथकासह विविध संस्था व स्वंयसेवक, आपदामित्र इ. सहभागी झालेल्याची एकुण संख्या - १९७५
- वाडीचे नांव इरशालवाडी
- कुटुंबसंख्या - ४३
- लोकसंख्या २२९ (मयत- २५, हयात १२४, बेपत्ता ( अंदाजे ८०) 
- मयत व्यक्ती २४ • जखमी २१ (उपचार करुन सोडलेले- ११ + उपचार घेत असलेले १० )

- उपचार घेत असलेले १० (ग्रामीण रुग्णालय चौक -५ + MGM रुग्णालय नवी मुंबई ४ + पनवेल SDH-१) हयात व्यक्ती १२४ ( निवारा केंद्र- पंचायतन मंदिर नढाळ ६५, आश्रमशाळेमधील विद्यार्थी ३३, उपचार घेत असलेले- १०, नातेवाईकांकडे गेलेले १६ )
- बेपत्ता व्यक्ती ८१ अंदाजित
- मृत जनावरे दुधाळ जनावरे ( गाय- १ म्हैस - ० ) .
- लहान जनावरे ( बकरी० शेळी २ मेंढी ० ) - • वैद्यकिय सुविधा बेस कॅम्प मानिवली
- तात्पुरते पुनर्वसन आपादग्रस्त कुंटुंबाच्या तात्पुरत्या निवासासाठी सूर्या हॉटेल समोर चौक येथे ३४ पोर्टेबल कंटेनर उपलब्ध करुन दिले असून सदर ठिकाणी विज, पाणी, टॉयलेट इत्यादी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

- मा. मुख्यमंत्री, मा. पालकमंत्री, मा. विरोधी पक्ष नेते, इतर सन्मानीय मंत्री, मा. खासदार मा. आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांनी सदर घटनास्थळी भेट देवून जखमी व वाचवलेल्या व्यक्तींचे तसेच शोध व बचावकार्य करणाऱ्या जवान व स्वयंसेवकांचे भेट देवून मनोधैर्य वाढवले, अशी माहिती संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी रायगड-अलिबाग यांनी दिली. 

Web Title: Irshalwadi accident: What happened so far, district administration gave detailed information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.